आर्य निकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज पारेगाव येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी.

प्रतिनिधी ऋषिकेश गायकवाड येवला
पारेगाव (ता. येवला) आर्य निकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पारेगाव येथे गुरुवार, दिनांक 10 जुलै 2025 रोजी गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगण्यात आले. तसेच निबंध स्पर्धा, विद्यार्थ्यांची भाषणे व शिक्षकांची प्रेरणादायी भाषणे घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणांतून गुरू-शिष्य परंपरेचे महत्त्व प्रभावीपणे मांडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री. खुशाल गायकवाड सर होते. संचालिका सौ. कल्पनाताई गायकवाड, मुख्याध्यापक श्री. ऋषिकेश गायकवाड यांच्यासह शाळेचे सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व संयोजन शिक्षकांनी उत्तम प्रकारे पार पाडले. संपूर्ण कार्यक्रमाने शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये गुरूजनांविषयी आदर व कृतज्ञतेची भावना निर्माण केली.