Breaking
आरोग्य व शिक्षण

आज महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक :नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांनी मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन

0 1 0 7 4 3

आज महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक :नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांनी मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन

मुंबई, दि.३ : महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक नियोजित वेळापत्रकानुसारच गुरुवार दि. ३  एप्रिल रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत होत असून . या निवडणुकीत नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांनी मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे सचिव धीरज कुमार यांनी केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने SLP No. ८५७६/२०२५ या याचिकेमध्ये विद्यमान निर्वाचन अधिकाऱ्यांऐवजी “अवर सचिव स्तराचे नवीन निर्वाचन अधिकारी” तात्काळ नियुक्त केल्यास निवडणूक प्रक्रिया पुढे सुरू ठेवता येईल असे निर्देश २ एप्रिल २०२५ रोजीच्या आदेशान्वये दिले आहेत. या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निवडणूक घेण्याकरिता वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे अवर सचिव सुनीलकुमार धोंडे यांची नियुक्ती निर्वाचन अधिकारी म्हणून करण्यात आली आहे, असेही सचिव धीरज कुमार यांनी कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

नवप्रभा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 0 7 4 3

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे