निफाड तालुक्यातील अतिक्रमित शिवरस्ते मोकळे होणार

लासलगाव :- निफाडचे तत्पर तहसिलदार विशाल नाईकवाडे यांचे मुळे निफाड तालुक्यातील गांव नकाशाप्रमाणे अतिक्रमीत व बंद झालेले शिवरस्ते, गाडी रस्ते, पाणंद, पांधण, शेतरस्ते, शिवाररस्ते, शेतावर जाण्याचे पायमार्ग आता मोकळा श्वास घेणार आहे.
नाशिकचे जिल्हाधिकारी यांनी याबाबत दि.१८ डिसें.रोजी परिपत्रक काढले असून परिपत्रकात नमुद केलेनुसार गांव नकाशा प्रमाणे अतिक्रमीत व बंद झालेले शिवरस्ते, गाडी रस्ते, पाणंद/पांधण, शेतरस्ते, शिवाररस्ते, शेतावर जाण्याचे पायमार्ग मोकळे करुन जमिनीत जाणे येणेसाठी रस्ता उपलब्ध व्हावा यासाठी तालुकास्तरीय व ग्रामस्तरीय समिती गठित समिती मार्फत रस्त्यांसंबधी उद्भवणारे वाद मिटवून सर्व सहमतीने रस्ता खुला करणे व मामलेदार न्यायालय अधिनियम १९०६ चे कलम ५ व
महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ चे कलम १४३ अन्वये दाखल असलेले प्रकरणात निर्णय घेणे कामी तसेच वरील प्रयत्नातुन रस्ता खुला होत नसल्यास उपअधिक्षक भुमी अभिलेख यांचे सहाय्याने रस्ता निश्चित करुन पोलीसांचे सहाय्याने तो खुला करणेबाबत नमूद आहे. संदर्भीय परिपत्रकात नमुद केलेनुसार अंमलबजावणी करणेकामी समन्वयाने मोकळे न झालेले
चितेगाव – चेहडी शिवस्ता, चितेगाव पवार वस्ती – शेलार वस्ती रस्ता, मांजरगाव – खानगाव थडी शिव रस्ता, औरंगपुर – महाजनपुर शिव रस्ता, गाजरवाडी – सुंदरपुर सहयोगी, ब्राम्हणवाडे – सोमठाणे (जुना ग्रामीण) रस्ता, ठाकरे वस्ती – सारोळेथडी रोड लगत रस्ता, हनुमान नगर – डोंगरगाव शिव रस्ता, विचूर – गोंदेगाव शिव रस्ता, विष्णुनगर – हनुमान नगर शिवरस्ता, सोनेवाडी बु- सोनेवाडी खुर्द शिव रस्ता, कुंदेवाडी- रोळस शिव रस्ता, शिवडी – सोनेवाडी बु. – सोनेवाडी खुर्द शिवरस्ता, रानवड – कुंभारी शिवरस्ता, देवगाव- वाकद शिवरस्ता, देवगाव – रुई शिवरस्ता, साकोरे – कोकणगाव ओझर शिवरस्ता, पिंपळगाव ब. आहेरगाव शिवरस्ता, कोकणगाव – शिरसगाव शिवरस्ता, वडाळी नजिक कसबे सुकेणे शिवरस्ता, वनसगाव- खान गाव जवळ शिवरस्ता, खडकमाळेगाव – खान गाव जवळ शिवरस्ता हे मोजणी करुन पोलीस बंदोबस्तात बंद झालेले रस्ते खुले करणेबाबत निफाड तालुक्यातील अतिक्रमित रस्ते खुले होणार आहे.