स्पर्धा परीक्षेत लासलगावच्या अनिकेत (गौरव) मोरे व सागर शिंदे मारली बाजी
सागर शिंदे याने महसूल सहाय्यक तर अनेकेत मोरे याने टॅक्स असिस्टंट ही परीक्षा उत्तम गुणांसह उत्तीर्ण केली.

यशाच्या मागे गुपित वगैरे असं काहीच नसतं असते ती प्रचंड मेहनत, जिद्द, चिकाटी, उज्वल, भविष्याची स्वप्न.. आई-वडिलांचे अपार कष्ट डोळ्यात साठवत स्पर्धा परीक्षांसारख्या कठोर अभ्यासक्रम असलेल्या परीक्षेत आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध करीत यशाचे शिखरे गाठत लासलगाव वॉर्ड क्रमांक 6 चे रहिवासी चिरंजीव अनिकेत (गौरव) मोरे व सागर शिंदे यांनी यशाची मोहर उठवली. सागर शिंदे याने महसूल सहाय्यक तर अनेकेत मोरे याने टॅक्स असिस्टंट ही परीक्षा उत्तम गुणांसह उत्तीर्ण केली. जय श्रीराम महिला स्वयंसहाय्यता गटाच्या सचिव निर्मला मोरे व वंदना शिंदे यांच्या परिवाराच्या कष्टाला तोड। त्यांच्या मुलांनी मिळवलेल्या यशाचा मैत्री ग्रुप ला व बचतगटाला सार्थ अभिमान आहे मैत्री ग्रुप तसेच बचत गट प्रमुख मैत्रेयी गटाच्या अध्यक्ष स्मिताताई कुलकर्णी श्रावण सरी गटाच्या अध्यक्ष सोनाली कर्डिले इच्छापूर्ती गटाच्या शैला सोनवणे सुवर्णयुग गटाच्या कविता चव्हाण ज्ञानेश्वरी गटाच्या रजनी कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. आरती सोनवणे, सीमा देशमुख, संजीवनी सोनवणे, मंगल ताई शिरसाठ, कविता कर्डिले, रोहिणी काळे, मुक्ता ताई शिरसाठ, मंगल ताई होळकर मनीषा होळकर, सविता पवार, शुभांगी होळकर यांचे अनमोल सहकार्य लाभले.