Breaking
ब्रेकिंग

एक नर्स ही केवळ रुग्णांची सेवा करणारी व्यक्ती नसते, तर ती आईसारखी माया लावणारी, बहीणसारखी आधार देणारी आणि मैत्रीण म्हणून मन सांभाळणारी असते.- श्रीमती दाभाडे

उपजिल्हा रुग्णालय निफाड येथे महिला दिन उत्साहात उत्साहात साजरा

0 1 0 7 4 2

 

निफाड:- उपजिल्हा रुग्णालय निफाड येथील कार्यरत डॉ राजीव तांभाळे, वैद्यकिय अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली महिला दिन साजरा करण्यात आला यात रुग्णालयातील सर्व कार्यरत अधिपरिचारिका व महिला कर्मचारी यांना पुष्प व माता रमाबाई आंबेडकर व सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर आधारित महामाता, प्रा. गौतम निकम यांचे पुस्तक भेट म्हणून औषध निर्माण अधिकारी श्री बिऱ्हाडे व प्रयोगशाळा वैज्ञनिक अधिकारी श्री कोल्हे यांच्या हस्ते देण्यात आले.

डॉ सुनीता ढेपले, वैद्यकीय अधिकारी यांनी प्रस्ताविक करतांना सांगितले की आज ८ मार्च, आंतरराष्ट्रीय महिला दिन, एक असा दिवस आहे जो आपल्या स्त्रीशक्तीचा, त्यागाचा आणि अतुलनीय कर्तृत्वाचा सन्मान करतो. सर्वप्रथम येथील कार्यरत सर्व नर्सिंग स्टाफच्या सदस्यांना या विशेष दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या

यानंतर मेट्रन श्रीमती दाभाडे  यांनी याप्रसंगी सांगितले की, नर्सिंग हा केवळ एक व्यवसाय नाही, तर तो एक सेवा, समर्पण आणि ममत्वाचा पवित्र व्रत आहे. आपण सर्वजणी रुग्णांची काळजी घेणाऱ्या ‘फ्लॉरेन्स नाईटिंगेल’ प्रमाणे अहोरात्र मेहनत घेत आहात. एक नर्स ही केवळ रुग्णांची सेवा करणारी व्यक्ती नसते, तर ती आईसारखी माया लावणारी, बहीणसारखी आधार देणारी आणि मैत्रीण म्हणून मन सांभाळणारी असते. तसेच आम्ही दिवसरात्र रुग्णसेवा करत असतो, रुग्णांचे दुखः हलके करण्याचा प्रयत्न करत असतो आणि अनेक वेळा स्वतःच्या आनंदाचा त्याग करून इतरांना हसवतो. आपल्या हातूनच रुग्णाला नवीन आयुष्य मिळते, कारण आपण केवळ औषध देत नाही, तर प्रेम, आपुलकी आणि आशेची ऊबही देतो.

यानंतर महिला दिनाचे औचित्य साधून औषध निर्माण अधिकारी बिऱ्हाडे यांनी सांगितले की ,महिला म्हणजे त्याग, संयम आणि सहनशीलतेचे प्रतीक. आजच्या युगात महिला प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे, पण नर्सिंग हे एक असे क्षेत्र आहे जिथे महिलांचा त्याग, मेहनत आणि प्रेम हे सर्व जगासाठी प्रेरणादायी आहे.अधिपरीचारिका म्हणून आपण ज्या जबाबदाऱ्या पार पाडतो, त्या समाजासाठी अनमोल आहेत. आपली सेवा हा एक कर्तव्य धर्म आहे. आपल्यामुळेच एक रुग्ण बरा होतो, त्याच्या कुटुंबाला दिलासा मिळतो आणि संपूर्ण समाज निरोगी राहतो.

शेवटी सर्व महिला कर्मचारी यांच्याकडून शीतल नाटे यांनी सांगितले की आजच्या या महिला दिनाच्या निमित्ताने उपजिल्हा रुग्णालय निफाड येथे आपण सर्वांनी स्त्रीशक्तीचा सन्मान केला असल्याने सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाचे आभार मानले तसेच आम्ही सर्वजण मागील प्रमाणे अधिक जोमाने रुग्णसेवा करण्याचा संकल्प या रोजी करतो असे म्हटले

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

नवप्रभा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 0 7 4 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे