Breaking
ब्रेकिंग

माजी खासदार समीर भुजबळ यांनी केली येवला शहरातील सिग्नलची पाहणी : उपक्रम यशस्वीरित्या राबविण्याबाबत पोलीस व नियुक्त कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.

0 1 0 7 4 2

येवला प्रतिनिधी सचिन शिंदे

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून नाशिक जिल्ह्यात पहिल्यांदाच श्री लक्ष्मी मोटार ड्रायव्हिंग स्कूल येवला, येवला शहर पोलीस स्टेशन व प्रादेशिक परिवहन कार्यालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने
येवला शहरातील सिग्नलवर प्रायोगिक तत्त्वावर खाजगी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वाहतुकीचे नियम फक्त नियम म्हणून न पाहता एक सामाजिक जबाबदारी म्हणून वाहतुकीचे नियम पाळा आणि एक सुजाण नागरिकाचे कर्तव्य पार पाडा असा या उपक्रमाचा उद्देश आहे.

आज येवला दौरावर असताना माजी खासदार समीर भुजबळ यांनी या उपक्रमानिमित्त येवला शहरातील सिग्नलची पाहणी केली. यावेळी हा उपक्रम यशस्वीरित्या राबविण्याबाबत पोलीस व नियुक्त कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.

यावेळी येवला शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धीरज महाजन, लक्ष्मी मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे प्रमुख मोहन शेलार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार,विधानसभा उपाध्यक्ष दत्ता निकम, राजेश भांडगे, स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे, भाऊसाहेब धनवटे, भूषण लाघवे, महेश गादेकर, विशाल परदेशी, गोटू मांजरे, प्रीतम शहारे, प्रकाश बागल, गणेश गवळी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

 मा उपमुख्यमंत्री मा छगन भुजबळ यांचे माध्यमातून येवला सारख्या ग्रामीण भागात सिग्नल यंत्रणा सुरु झाली आहे. नव्याचे नऊ दिवस नागरिकांनी सिग्नल नियम पाळले मात्र आता स्थानिक लोक सिग्नल नियम पाळत नाही. आपण समाजाचे काही देणे लागतो ही भुजबळ साहेबांची कार्यकर्त्यांना शिकवण आहे. याच सामाजिक भावनेतून लोकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत या हेतूने स्वखर्चाने 2 कर्मचारी उपलब्ध करून दिले आहेत. लक्ष्मी ड्रायविंग स्कूल, येवला पोलीस आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे संयुक्त विद्यमाने प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम राबवत आहोत. नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळून सहकार्य करावे..

   डॉ मोहन शेलार
संचालक लक्ष्मी मोटर ड्रायविंग स्कूल येवला

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

नवप्रभा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 0 7 4 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे