Breaking
महाराष्ट्र

करंजगाव येथे महाशिवरात्री निमित्ताने सिद्धेश्वर महादेव मंदिरात भव्य अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

0 1 0 7 4 3

 

 

निफाड तालुक्यातील करंजगाव येथे गोदातीरी वसलेल्या प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये व सिद्धेश्वराचे सिद्धस्थान असलेल्या सिद्धेश्वर महादेव मंदिरात….महंत श्री विठ्ठलनाथ जी महाराज व ह. भ .प .गोविंद महाराज लोणजाई यांच्या शुभ प्रेरणेने व ह. भ .प.गुलाब महाराज खालकर आर्वी यांच्या कुशल मार्गदर्शनाने व समस्त ग्रामस्थ करंजगाव यांच्या सहकार्याने सालाबाद प्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे

. तरी या परमार्थिक संधीचा समस्त ग्रामस्थ व पंचक्रोशीतील सर्व भाविक लाभ घेत आहेत. तरीही इतर भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन करंजगाव येथील समस्त भजनी मंडळ व सिद्धेश्वर महादेव मंदिर भक्त परिवाराने केले आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध असे कीर्तनकार माधव महाराज चव्हाण बेरवाडी,
प्रसाद महाराज शेळके लासलगाव,ऋषिकेश महाराज कुयटे धानोरे , सौरभ महाराज जाधव कुंडाणेकर
योगेश महाराज जाधव कान्हेरवाडी ,
निवृत्ती महाराज रायते खडक माळेगाव ,
गोरक्षनाथ माऊली जाधव शहा कारवाडी ,
मुरकुटे महाराज माऊली आळंदी यांचे दररोज रात्री ९ ते ११ या वेळेत हरी किर्तन संपन्न होत आहे.ज्ञानेश्वर माऊली शिंदे रुई आश्रम यांचे गुरुवार दिनांक २७/ २/२०२५ रोजी काल्यांचे कीर्तन सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत आयोजित केलेले असून समस्त करंजगाव ग्रामस्थ यांच्या वतीने गुरुवार रोजी महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेले आहे. तरी पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.याप्रसंगी गायक भजनसम्राट अंबादास महाराज टेकाळे, केसापूर हिंगोली संगीतकार सिद्धेश्वर महाराज हुसे सिंदखेडराजा
गोविंदा अण्णा राजोळे ,सुरेश नामदेव राजोळे, भाऊसाहेब टिळे, कारभारी पोटे गायत्री खाडे ,प्रगती कोटकर, गायक असून मृदुंगाचार्य म्हणून पार्थ महाराज रायते, अथर्व महाराज पडोळ ,शंकर महाराज लोखंडे ,तुषार महाराज डेर्ले जनार्दन राजोळे, रोहित महाराज मुळे हे असून विणेकरी सूर्यभान महाराज पवार एकनाथ महाराज भगुरे काकड आरतीसाठी कचरू महाराज पिंगळे आहुर्ली, केशव महाराज महाले वांजुळी, शंकर महाराज गवारे इगतपुरी.पहारेकरी शिवनाथ रुद्रवंशी, रामेश्वर पावशे, निंबाजी टिळे, शिवाजी कोटकर, कैलास कोटकर, सोमनाथ टिळे , विष्णू पगार ,मधुकर ढेपले भालदार चोपदार गणपत रामभाऊ राजोळे , अर्जुन जगन्नाथ भगुरे असून करंजगाव ,चापडगाव ,भुसे, भेंडाळी, माळसाकोरे, गाजरवाडी,शिवरे ,शिंगवे ,कोठुरे, मांजरगाव ,सोनगाव ,सुंदरपूर, काथरगाव, सायखेडा ,औरंगपूर, चांदोरी ,भाऊसाहेब नगर रामनगर, महाजनपूर ,बेरवाडी व गोदाकाट परिसरातील भजनी मंडळ उपस्थित राहत आहे यावेळी समर्थ मंडप डेकोरेशन अँड साऊंड सिस्टिम करंजगाव तसेच सप्तशृंगी माता फुलहार सेवा करंजगाव यांचेकडून विशेष सहकार्य होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

नवप्रभा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 0 7 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे