बीजेपी जिल्हा चिटणीस यांनी केला आपल्या मुलीचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा

सचिन शिंदे येवला.
वाढदिवस साजरा करण्याचे विविध फंडे आजकाल अवलंबले जातात. मित्र व कुटुंबात जेवणावेळी केक कापण्याचा सार्वजनिक सोहळा, फ्लेक्स बाजी, पर्यटनाला जाणे, महागड्या वस्तूंची खरेदी करणे इत्यादी. सर्व प्रकाराला फाटा देत येवला तालुक्यातील बीजेपी महिला चिटणीस तथा समाजसेविका मनीषा चव्हाण यांनी अनाथ आश्रमातील मुलांसोबत त्यांच्या मुलीचा वाढदिवस साजरा केला.
नाशिक येथील महात्मा नगर अंधशाळा.
व नाशिक येथीलच एका अनाथ आश्रमातील मुलांसोबत त्यांनी वाढदिवस नुकताच साजरा केला तेथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून खाऊच वाटप करण्यात आले यावेळी आश्रमातील मुलींनी स्वागत गीत गाऊन व औक्षण करून चव्हाण यांच्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आश्रमातील प्रमुखांनी चव्हाण यांची आभार मानले व यांच्या संकल्पनेचे स्वागत करत त्यांना पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.