गुरुपौर्णिमेनिमित्त भारतातील दुसरे कामख्या माता जागृत देवस्थान धारणगाव तालुका निफाड येथे होम हवन यज्ञ संपन्न.

प्रतिनिधी:- सचिन शिंदे
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने होम हवन करणे, म्हणजे गुरु प्रति कृतज्ञ व्यक्त करण्याचा एक धार्मिक विधीआहे यात अग्नीमध्ये म्हणजेच होम यज्ञ सोहळ्यामध्ये विविध वस्तू अर्पण करून गुरूंच्या आशीर्वाद घेतले जातात .गुरुपौर्णिमा हा दिवस गुरु आणि शिष्य यांच्यातील पवित्र नाथाचा उत्सव आहे, आणि या दिवशी गुरूंची पूजा करून त्यांच्या प्रति आदर व्यक्त करण्याची परंपरा आहे.
होम हवन करणे. हा त्या पूजेचा एक भाग आहे, ज्यामध्ये गुरूंच्या प्रति असलेल्या भक्ती भावाने विविध वस्तू अग्नीमध्ये अर्पण केल्या जातात.
याच अनुषंगाने गुरुवारी गुरु पौर्णिमेच्या पवित्र दिवशी निफाड तालुक्यातील धारणगाव येथे *आजच्या गुहाटी येथील निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हजारो भक्तांचे श्रद्धास्थान मुख्य शक्तीपीठानंतर भारतातले दुसरे जागृत कामाख्या देवी मंदिर* येथे भव्य होम हवन यज्ञ सोहळा संपन्न झाला.
या पवित्र होम हवना यज्ञ सोहळ्या मध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला सुख समृद्धी लाभो यासाठी प्रार्थना करण्यात आली…
या कार्यक्रमासाठी फोटो , व्हिडिओ ,ड्रोन शूटिंग याच नियोजन *गौरव कृषी सेवा केंद्र गुळवंच* यांनी केले होते त्यांचे मंदिर प्रशासनाच्या वतीने आभार मानण्यात आले