Breaking
ब्रेकिंग

ब्राह्मण महासंघ मैत्रेयी महिला मंडळा तर्फे महिला दिन व धुळवळीचा सण उत्साहात  साजरा..

0 1 0 7 4 2

मुख्य संपादक -महेश साळुंके 

 

 

महिला दिन तर होऊन गेला? मग आता काय त्याचे पण जिथे स्त्रीचा आदर असतो ज्या क्षणांनी ती आनंदित होते तो दिवस म्हणजे आपला महिला दिनच असतो त्यातच धुळवड सण म्हणजे रंगाचा उत्सव विविध भागातून आलेल्या महिला आयुष्याचे वेगवेगळे रंग असताना सामाजिक बांधिलकीतून एकत्र येतब्राह्मण समाजाचे कार्य करत असतात अनेक वेगवेगळ्या उपक्रमातून आपण समाजाचे देणं लागतो याची जाणीव ठेवत मैत्रेयी मंडळ कार्य करत असते असे मनोगत ब्राह्मण महासंघ विश्वस्त स्मिताताई कुलकर्णी यांनी केले दीपप्रज्वलन प्रतिमापूजनाने कार्यक्रमास सुरुवात झाली यावेळी प्रमुख पाहुणे कार्यक्रमाच्या आयोजक मंजुश्री ताई केंगे गायत्री ताई केंगे सुनीताताई जोशी संध्या बुवा होत्या.राजश्री ताई सबनीस यांनी संस्कार परंपरा टिकवण्याची जबाबदारी महिलांची आहे नव पिढीला आपलंस करत परंपरा सांभाळत महिलांनी त्यांच्या क्षेत्रात कार्य केले पाहिजे वाचन संस्कृती टिकवली पाहिजे असे मनोगत व्यक्त केले. अर्चना कुलकर्णी यांनी विविध क्षेत्रातील महिलांचा पुढाकार सक्षम पिढीसाठी त्या करत असलेल्या कार्यावर भाष्य केले उपाध्यक्ष सौ. प्राजक्ता केंगे सचिव तृप्ति केंगे यांनी उत्तम सजावट नैसर्गिक रंगात रंगवत धुळवळीचा आनंद सर्वांना दिला महिला संघटीकरण, आर्थिक सक्षमीकरण, अध्यात्मक, खेळ, गाणी, दिलखुलास गप्पा अशा विविधतेने परिपूर्ण कार्यक्रमाने महिलांना आनंद मिळाला. सूत्रसंचालन स्मिता कुलकर्णी यांनी केले उपाध्यक्ष स्वाती जोशी यांनी प्रश्नोत्तर खेळाने हास्य फुलवत कार्यक्रमात उत्साह आणला कार्यक्रमास लताअग्निहोत्री भाग्यश्री, गौरी, हंसिका, सविता, आदिती जोशी, मृणाल, ईश्वरी, विशाखा प्राजक्ता, केंगे, नेहा खानापूरकर, सरला, उज्वला, दीक्षित, संपदा भंडारी, रेणुका दिपाली कुलकर्णी, छाया नंदा शर्मा व इतर महिला उपस्थित होत्या.*

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

नवप्रभा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 0 7 4 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे