पिंपळगाव नजीक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे जल्लोषात आगमन…. मिरवणूकीस माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पूर्व पूर्वसंध्येला शिवजयंती उत्सव समिती पिंपळगाव नजीक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे मोठ्या जल्लोषात आगमन झाले. या सोहळ्यास माजी खासदार समीर भुजबळ यांनी उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले.
पिंपळगाव नजीक जयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य दिव्य अश्वारूढ पुतळा साकारला आहे. या पुतळ्याचे आज पिंपळगाव नजीक येथील मुख्य चौकात जल्लोषात स्वागत झाले. यावेळी समितीच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी करत, फुलांची उधळण करून, वाजत गाजत पुतळ्याचे स्वागत करण्यात आले. यावेळी पिंपळगाव नजीक येथील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी डॉ.श्रीकांत आवारे, कैलास सोनवणे, राजेंद्र चाफेकर, तुकाराम गांगुर्डे, गंगाराम खुळे, बालेश जाधव, पांडुरंग राऊत, विलास गोरे, धनंजय वाकचौरे, राजेंद्र बोरसे, सागर आढाव,कैलास भुजबळ, आबा ठाकरे, सचिन वाघ यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.