कोल्हापुर ते शिवतीर्थ “पक्षध्वज पायी संकल्प यात्रा”
कोल्हापूर महालक्ष्मी मंदिरात पुरोहितांकडून विधीवत ध्वज पुजन करुन अंबाबाईला आगामी काळात मनसेला निवडणूकीत घवघवीत यश मिळावे यासाठी साकडे

मुख्य संपादक -महेश साळुंके
कोपरगाव – ऐन निवडणुकच्या तोंडावर पक्षांतर करणारे आयाराम-गयाराम असोत किंवा एखाद्या पक्षाने तिकीट नाकारले म्हणून बंडखोरी करणारे असोत या सर्वांत उठून दिसतो हा सर्वसामान्य कार्यकर्ताच आणि तो जर मनसे चा महाराष्ट्र सैनिक असेल तर विषयच निराळा; असाच एक मु/पो. कोपरगांव(शिर्डी) जि. अहिल्यानगरचा महाराष्ट्र सैनिक प्रमोद ताराबाई प्रकाश आरणे यांनी मनसे च्या १९ व्या वर्धापन दिनी “पक्षध्वज पायी संकल्प यात्रा” करणार असा संकल्प केला आणि दिनांक १७ मार्च २०२५ रोजी कोल्हापूर महालक्ष्मी मंदिरात पुरोहितांकडून विधीवत ध्वज पुजन करुन अंबाबाईला आगामी काळात मनसेला निवडणूकीत घवघवीत यश मिळावे यासाठी साकडे घातले. आणि प्रवासाला सुरुवात केली आहे.
दिनांक २९ मार्च २०२५ रोजी ‘शिवतीर्थ’ या दादर स्थित मा. राजसाहेबांच्या निवासस्थानी हा मनसैनिक पोहचणार आहे व पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात सहभागी होणार आहे.सदर संकल्प पुर्ती साठी कोपरगांव तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्मान सेना कार्यकर्त्यांनी तसेच पक्ष पदाधिकार्यांनी शुभेच्छा दिल्या आहे.