निफाडतालुक्यात नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष सयाजीराव झुंजार व पदाधिकाऱ्यांचे जोरदार स्वागत समाजाच्या विकासासाठी संघटनेचा पाया मजबूत होण्याची गरज : सयाजीराव झुंजार
निफाड :-महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष सयाजीराव झुंजार, माजी प्रदेशाध्यक्ष दत्ताशेठ अनारसे, माजी प्रदेश उपाध्यक्ष अशोक सुर्यवंशी, नारायणराव यादव,राजेश जाधव, अरविंद देसाई, अरुण सौंदाणे नवनिर्वाचित प्रदेश उपाध्यक्ष संजय गायकवाड, महिला उ.महाराष्ट्र अध्यक्ष सिमाताई राऊत, महिला जिल्हाध्यक्ष संगीताताई मगर,महिला नासिक शहराध्यक्ष सविताताई सस्कर,नासिक लोकसभा अध्यक्ष सुरेश सुर्यवंशी, दिंडोरी लोकसभा जिल्हाध्यक्ष अनिल वाघ यांचे निफाड येथील शांतीनगर चौफुली येथे नाभिक महामंडळाचे निफाड तालुका, अध्यक्ष डाॅ.प्रकाशजी वाघ तालुका उपाध्यक्ष प्रमोद भाऊ सोनवणे यांच्या हस्ते सर्व पदाधिकार्यांचे शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोषात स्वागत करण्यात आले.
यानंतर निफाड पिंपळगाव रोड येथे साकार होत असलेल्याश्री.विठ्ठल रुख्मिणी,श्री.संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज व श्री.संत सेना महाराज मंदिराच्या बांधकामास भेट देण्यात आली.यावेळी श्री संत सेना फाउंडेशनचे अध्यक्ष व निफाड शहरातील सर्व नाभिक समाज बांधवांच्या हस्ते पदाधिकार्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मंदिराचे होत असलेल्या कामाबद्दल आनंद व्यक्त केला
यावेळी प्रदेशाध्यक्ष सयाजीराव झुंजार यानी आपले मनोगत व्यक्त करताना संघटन समाजाचा पाया मजबूत करण्यासाठी गरजेचे असुन सर्वच समाजामध्ये संघटनेला एक वेगळे महत्व असते आपला व्यवसाय सांभाळत संघटनेच्या माध्यमातून समाजकार्य करता येते त्याचा फायदा नक्कीच होतो त्यामुळे संघटनेच्या प्रवाहात येणे गरजेचे असल्याचे मत झुंजार यांनी व्यक्त केले.
यावेळी नाभिक महामंडळाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय गायकवाड,आप्पासाहेब सुर्यवंशी,नारायणराव यादव, अरविंद देसाई,,अनिल वाघ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी नाभिक महामंडळाचे निफाड तालुकाध्यक्ष डाॅ.प्रकाश वाघ, तालुका उपाध्यक्ष प्रमोद भाऊ सोनवणे, वैभव वैद्य,मनोज अनारसे गणेश मगर,प्रविण कडवे,प्रमोद तुपे, , अविनाश देसाई,अभिजीत जगताप, नंदु बनभेरु, पिंटू बनभेरु,किशोर साळुंके,संतोष वाघ,संदिप आहेर,रत साळुंके भैरु कोरडे,शैलेश सोनवणे,शशिकांत महाले,मधुकर कणसे,कृष्णा महाले,मनोज खडांगळे,जेष्ठ मार्गदर्शक सोमनाथ सोनवणे,निफाड शहराध्यक्ष संजय आहेर,शरद वाघ, विजय सोनवणे,किशोर बिडवे,दिपक जाधव, राकेश सोनवणे,ज्ञानेश्वर गायकवाड, संतोष पंडीत, विशाल कणसे,सिताराम गायकवाड,संदिप सोनवणे,गणेश मगर,संदिप शिंदे,नवनाथ वाघ,मयुर सोनवणे, नारायण सुर्यवंशी,रवी गायकवाड,बाळु बोरसे,
संजय शिंदे यांसह तालुक्यातील नाभिक समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.