दारु पिऊन पोलीस प्रशासनास डायल ११२ ला वारंवार खोटा कॉल दिला ; फोन करणाऱ्याविरूद्ध गुन्हा दाखल

महेश साळुंके- मुख्य संपादक
लासलगाव : नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या डायल ११२ वर फोन करून खोटी माहिती दिली म्हणून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रत्यक्ष पोलिसांनी सांगितलेल्या घटनास्थळी जाऊन पहाणी केली असता, असा काही प्रकार घडला नसल्याचे समजले. त्यामुळे पोलिसांनी खोटी माहिती दिली म्हणून संबंधित व्यक्ती विरूद्ध लासलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
अधिक माहिती अशी की, लासलगाव पोलिस ठाण्यात पोकाँ अविनाश सांगळे हे शुक्रवारी दी. ४ रोजी डायल ११२ वर ड्युटीला होते. दरम्यान त्यांना एम.डी.टी. चॅनल नंबर वर १५-४५ वाजण्याच्या सुमारास एका मोबाईल नंबरवरून अज्ञात व्यक्तीचा फोन आला. फोन वरील व्यक्तीने …….अशी माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार पोकाँ अविनाश सांगळे यांनी घटनास्थळी गेले असता नवनाथ बाळू मोकळ रा. नांदगाव ता. निफाड हा दारू पिऊन दारूच्या नशेत आढळून आला. परिसरात चौकशी केली असता असा कोणताही प्रकार या ठिकाणी घडला नसल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. डायल ११२ ही अति तात्काळ सेवा आहे हे माहिती असून देखील विनाकारण खोटा कॉल केला व खोटी माहिती दिली म्हणून पोकॉ अविनाश सांगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय दंड संहिता कलम २१७ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ८५(१)प्रमाणे संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पीएसआय साळुंके, पोह कांदळकर करीत आहेL
चुकीची माहिती दिल्यास कारवाई : भास्कर शिंदे
डायल ११२ हा लोकांच्या मदतीसाठी उपलब्ध करण्यात आलेला नंबर आहे. खरच काही अडचण असेल तर लोकांनी याचा जरूर लाभ घ्यावा. विनाकारण फोन करून चुकीची माहिती देऊ नये, हा फोन थेट मुंबई कार्यालयाला जात असतो. दिलेली माहिती चुकीची निघाल्यास संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी दिली