Breaking
ब्रेकिंग

पाटोदा व परिसरात मागील दीड महिन्यापासून धुमाकूळ घालणारी बिबट्याच्याची मादी अखेर जेरबंद .

0 1 0 7 4 2

पाटोदा प्रतिनिधी – सचिन शिंदे

पाटोदा:दि.20 : पाटोदा परिसरात बऱ्याच दिवसांपासून आपल्या पिल्लांसह धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याच्या मादीला जेरबंद करण्यात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले आहे
गावापासून काही अंतरावर असलेल्या कालव्या लगत सुमनबाई बन्सीलाल देव्हाडराव यांच्या मालकीच्या शेतामध्ये बुधवार (दि.19) रोजी बिबट्या जर बंद करण्यासाठी आर एफ ओ घुगे, वनपाल भगवान जाधव, वनसंरक्षक सोनाली वाघ , वाहन चालक चव्हाण व बाळकृष्ण सोनवणे तसेच पोलीस पाटील मुजम्मील चौधरी शेतकरी अमोल नाईकवाडे, चेतन बोनाटे ,वैभव नाईकवाडे, भगवान नाईकवाडे अंबादास शिंदे तसेच शेतकऱ्यांच्या सहाय्याने पिंजरा लावण्यात आला होता. रात्रीच्या सुमारास बिबट्याची मादी आपल्या शिकारीच्या शोधात पिंजरा लावलेल्या परिसरात फिरत असताना पिंजऱ्यात जेरबंद झाल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला मात्र अजुनही तिचे पिल्ले परिसरात असल्याच्या चर्चेने नागरिकांत अद्यापही भीतीचे वातावरण कायम असल्याचे चित्र आहे गेल्या काही दिवसांपासून या बिबट्याच्या मादीने पाटोदा व परिसराच्या सभोवताच्या परिसरात धुमाकूळ घातला होता जनावरे फस्त करण्यासोबतच तिच्या वावराने या परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. परिसरात अनेक ठिकाणी या बिबट्याच्या दर्शनाने शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने परिसरातील शेतकरी भयभीत झाला होता. शेतकरी व मजूर वर्ग शेतात जायला तयार होत नव्हते .आता या बिबट्याच्या वावर बंद झाल्यामुळे या भागातील ग्रामस्थांनी सुटकेचा निस्वास सोडला आहे पकडलेल्या बिबट्याला येवला येवला वनविभाग येथे हलवण्यात आले असून वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार पुढील कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी दिली.

5/5 - (1 vote)

नवप्रभा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 0 7 4 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे