मातोश्री हरकूबाई मोतीलालजी दायमा विविध सेवा भावी मंडळ, लासलगावचे वतीने जिल्हा परिषद मराठी व उर्दू शाळेत सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

मातोश्री हरकूबाई मोतीलालजी दायमा विविध सेवा भावी. मंडळ, लासलगावचे वतीने जिल्हा परिषद मराठी व उर्दू शाळेत सर्व विद्यार्थ्यांना सलग चौथ्या वर्षी दप्तर, टीफीन, वह्या, पेन, पेन्सिल, रंगपेटी, छञी, वाॅटर बॅग, इ. शालेय लेखन साहित्य सर्व विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.सोनियाताई होळकर होत्या. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लासलगाव खरेदी संघाचे चेअरमन श्री. शंतनु दादा पाटील, लासलगावच्या सरपंच सौ. योगिताताई पाटील माजी सरपंच श्री.अफजलभाई शेख, उपसरपंच श्री. रामनाथ शेजवळ, डॉ.प्रतापराव पवार हे होते. सदर प्रसंगी सोनियाताई होळकर यांनी असे सूचित केले की,मातोश्री हरकूबाई दायमा ट्रस्ट गरीब मुलांसाठी असे स्तुत्य उपक्रम राबवित आहे ट्रस्टचे विश्वस्तांना त्यांनी धन्यवाद दिले. सदर कार्यक्रम प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष श्री.प्रकाश दायमा, श्री.योगेश पाटील, बालेश जाधव, राजेंद्र चाफेकर,अरुण खांगळ सर, जितेंद्र चोथाणी, डॉ.संगीता सुरसे, विश्वस्त कैलास दायमा,अशोक दायमा, सचिव सुदिन टर्ले, वर्षा दायमा, राधीका दायमा, पूजा दायमा, वंदना वाढवणे, विस्तार अधिकारी वसंतराव गायकवाड, केंद्र प्रमुख पृथ्वीराज भदाणे, मुख्याध्यापिका जयश्री गायकवाड हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.श्रीनिवास दायमा यांनी व आभार प्रदर्शन मुख्याध्यापक साहिद अहमद यांनी केले.