पांडुरंगाच्या दर्शनासाठी दिंडीचे प्रस्थान पाऊले ..चालती.. पंढरीची …वाट..

सचिन शिंदे-पाटोदा
पाटोदा :दि.२० :सालाबादप्रमाणे यंदाही येवला तालुक्यातील श्रीक्षेत्र पाटोदा येथून महामुनी अगस्ती महाराज रामेश्वर पायी दिंडीचे प्रस्थान भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात (दि.१९)पंढरपूरच्या दिशेने झाले सकाळी रामेश्वर देवस्थान येथे भाविका-भक्तांच्या उपस्थितीत पालखी पूजन झाले. नंतर टाळ मृदुंगाच्या गजरात गावातून दिंडीची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी महिलांनी पूजन करून पालखीचे दर्शन घेतले डोक्याला पागोटा बांधलेला धोतराचा खोचा गुडघ्यापासून वर खवलेला कपाली टिळा अष्टगंध अन कपाळी बुक्का लावून हाती भगवी पताका घेऊन टाळ मृदुंगाचा गजर मुखी हरिनामाच्या जयघोषाने अवघी पाटोदा नगरी दुमदुमली..दिंडी चालली.. चालली.. विठ्ठलाच्या दर्शनाला… घुमे गजर हरिनामाचा …भक्त नामात दंगला…, या भक्ती गीताची नक्कीच आठवण येत अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाच्या आषाढी एकादशी सोहळ्यानिमित्त संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली ,जगद्गुरु संत तुकाराम, संत सोपान देव महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, संत मुक्ताबाई, संत एकनाथ महाराज या प्रमुख पालख्यांसह पावसाच्या हलक्याश्या कोसळणाऱ्या सरीत भिजत पाटोदा येथील महामुनी अगस्ती महाराज रामेश्वर दिंडी, माऊलीच्या दिंडी सोहळ्यामध्ये दिंडी क्रमांक 66 ने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले यामध्ये शेकडो महिला-पुरुष वारकरी सहभागी झाले