Breaking
ब्रेकिंग

लासलगावी महाराष्ट्र भूषण डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महास्वच्छता अभियान संपन्न

0 1 0 7 4 2

महेश साळुंके -मुख्य संपादक 

महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महास्वच्छता अभियान रविवार दिनांक २ मार्च २०२५ रोजी संपूर्ण भारतभर राविले गेले त्याचाच एक भाग म्हणून श्री बैठक लासलगाव यांच्या माध्यमातून लासलगाव ग्रामपंचायत परिसरात स्वच्छता अभियान राबविले त्यात एकूण १०० श्री सदस्य (स्वयंसेवक) २५ ग्रामपंचायत कर्मचारी व १०  मान्यवरांनी सहभाग घेतला यात एकूण १०५० किलो ओला कचरा व ९०५० किलो सुका कचरा एकूण कचरा १०, १०० किलो संकलित करुन त्याची विल्वेवाट लावण्यात आली
यात लासलगाव ग्रामपंचायतीचे चार ट्रॅक्टर व पिंपळगाव ग्रामपंचायत एक ट्रॅक्टर होता.

सदर अभियानाचे उद्घाटन लासलगाव येथील सरपंच सौ. योगिता योगेश पाटील यांनी केले याप्रसंगी योगेश पाटील,प्रवीण कदम, गोपी गोर,पंकज सुर्वे, योगेश गलांडे, शांताबाई चंद्रभान देशमुख,बाळासाहेब सोनवणे,सचिन नाईकवाडे, अकबर शेख,कोल्हे तात्या, काशिनाथ माळक्ष सरपंच पिंपळगांव नजिक, विजय क्षिरसागर, उत्तम वाघ, अ‍ॅड. सुभाष देशमुख, सौ. सिमाताई दरेकर उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

नवप्रभा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 0 7 4 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे