बँकांनी ए टी एम स्थळी प्रशिक्षित सुरक्षारक्षकांची नियुक्ती करावी : सहाय्यक पोलिस निरीक्षक भास्कर शिंदे

महेश साळुंखे – मुख्य संपादक
बँकांचे सिक्युरिटी ऑडिट झाले पाहिजे. एटीएमच्या ठिकाणी सीसीटीव्हीची निगराणी अत्यंत आवश्यक आहे.
: बँकांचे सिक्युरिटी ऑडिट झाले पाहिजे. एटीएमच्या ठिकाणी सीसीटीव्हीची निगराणी अत्यंत आवश्यक आहे. बँकांनी एटीएमस्थळी प्रशिक्षित सुरक्षारक्षकांची नियुक्ती करावी, अशी सूचना सहाय्यक पोलिस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी केली.
शहरातील सर्व बँकांच्या प्रमुख प्रतिनिधींची सहाय्यक पोलिस निरीक्षक भास्कर शिंदे यांचे दालनामध्ये बैठक घेण्यात आली. शहरातील एमटीएमच्या सुरक्षेचा सहाय्यक पोलिस निरीक्षक शिंदे यांनी आढावा घेतला.
एटीएम, बँकेतील चोरी व एटीएम कार्डची अदलाबदल करून फसवणूक आदी गुन्ह्यांना प्रतिबंध होण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. लासलगाव शहरातील विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत बँकेकडून शहरातील विविध परिसरात लावण्यात आलेल्या एटीएमची माहिती घेऊन पोलीस महानिरीक्षक साहेब नासिक यांचे परिपत्रका नुसार पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांचे आदेशा प्रमाणे सुरक्षेबाबत आढावा घेण्यात आला.
तसेच एमटीएममध्ये पैसे भरण्यासाठी नेमण्यात आलेल्या व्यक्तींची पोलिस तपासणी झाली आहे का, कॅश व्हॅनसमवेत शस्त्रधारी सुरक्षारक्षक नेमण्यात येतात किंवा कसे, त्यांच्याकडील शस्त्र परवाना वैध आहे का, एटीएममधील सीसीटीव्ही कार्यान्वित आहेत का ?
तेथील इमर्जन्सी अलार्म सिस्टिम सुरू आहे का, एटीएमचे केबिन व शटर सुरक्षेच्या दृष्टीने सुस्थितीत असते का, प्रत्येक एटीएमच्या ठिकाणी प्रशिक्षित सुरक्षारक्षक तैनात आहे का, एटीएम असलेल्या ठिकाणच्या जवळील मुख्य चौकात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत का, एटीएम व बँकांचे सिक्युरिटी ऑडिट झाले आहे का आदींबाबात बैठकीत चर्चा झाली.
सर्व बँक प्रतिनिधींकडून माहिती घेण्यात आली. ज्या बँकेकडून सूचनांमध्ये त्रुटी असतील त्यांना त्यासंबंधी त्वरित उपाययोजना करण्यासंदर्भात सहाय्यक पोलिस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी सूचना दिल्या.