Breaking
ब्रेकिंग

उपजिल्हा रुग्णालय निफाड येथे बिनटाक्याचे कुटुंब नियोजन शस्त्रक्रियाचे शिबिर संपन्न .

0 1 0 7 4 2

.

जिल्हा रुग्णालय नाशिक व जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जिल्हा रुग्णालय नाशिक येथे कार्यरत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ चारुदत्त शिंदे व जिल्हा आरोग्य अधिकारी, नाशिक येथील कार्यरत डॉ सुधाकर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली बिन टाक्याचे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले

या शिबिराची सुरूवात करतांना या शिबिराकरिता महाराष्ट्रातील सर्वांत जास्त कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणारे डॉ वसंत जमदाडे सर यांचे डॉ राजीव तांभाळे, वैद्यकीय अधिक्षक यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. सदरील शिबिरात एकूण 52 महिलांचे बिन टाक्याचे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहे.

सदरील बिन टाक्याचे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया बाबत उपजिल्हा रुग्णालय निफाड येथे कार्यरत वैद्यकीय अधिक्षक, डॉ राजीव तांभाळे यांनी महत्व सांगताना म्हटले की या शस्त्रक्रियेत महिलाना कमी त्रासदायक आणि वेदनारहित प्रक्रिया असते,या शस्त्रक्रियेत कोणतेही मोठे काप किंवा टाके घेतले जात नाहीत, रक्तस्राव खूप कमी होतो. बिन टाक्याच्या शस्त्रक्रियेमुळे रुग्ण काही तासांत घरी जाऊ शकतो त्यानंतर रुग्ण आपल्या दैनंदिन कामकाजाकरिता जलद परतू शकतो. गर्भधारणा टाळण्यात ही शस्त्रक्रिया अतिशय प्रभावी आहे.

यानंतर तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुजित कोशिरे सरांनी सदरील शिबिराबाबत माहिती दिली की ,एकदाच केलेली शस्त्रक्रिया आजीवन प्रभावी राहते, महिलांना वारंवार गोळ्या किंवा इतर गर्भनिरोधक वापरण्याची गरज भासत नाही.
ही प्रक्रिया तुलनेने स्वस्त आहे आणि आरोग्य केंद्रांमध्ये सहज उपलब्ध आहे. सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत केली जाते. कुटुंब नियोजनामुळे आर्थिक आणि सामाजिक प्रगतीस चालना मिळते. स्त्रियांच्या आरोग्याचे संरक्षण होते आणि मातृमृत्यू दर कमी होतो. याकरिता अश्या सर्व शिबिरात आपले बिन टाक्याचे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेण्याबाबत अहवान केले

या शिबिराचे नियोजन उपजिल्हा रुग्णालय निफाड यांनी केले होते उपजिल्हा रुग्णालय निफाड येथील कार्यरत डॉ लाड सर, डॉ गावले सर, डॉ . प्रल्हाद चव्हाण, डॉ आथरे, डॉ रामेश्वर गोराडे, मेट्रन, दाभाडे ,अधिपरिचारिका, पाटील, निरभवने, निळे, कंटाळे, प्रयोगशाळा वैज्ञनिक अधिकारी पौर्णिमा कोंडके, प्रयोगशाळा सहायक साळुंके, शिपाई, अरुण गोसावी, सुनील राठोड व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते . तसेच पंचायत समिती आरोग्य विभाग, निफाड अंतर्गत कार्यरत डाॅ सुजित कोशिरे तालुका आरोग्य अधिकारी, डाॅ जाधव निमगाव वा, डाॅ कलिम पठाण, डाॅ रुपाली आहेर CHO
,श्री सारजळ, श्रीम शिरसाठ विस्तार अधिकारी,श्री मन्सूरी, श्री राजेंद्र सानप,आरोग्य सहाय्यक, श्री समिर मुरडेश्वर, श्री दिलिप बोदडे, श्री थोरे, श्री भांड MPW यांचे सदरील शिबिराकरिता मोलाचे योगदान केले

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

नवप्रभा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 0 7 4 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे