निफाड तालुक्यातील करंजगाव येथे माघी पौर्णिमेला श्रीखंडेराव महाराजांच्या बारा गाड्या ओढतो अश्व…
यात्रोत्सव मोठ्या उत्साहाने संपन्न...
मुकुंद आव्हाड – सारोळे थडी
निफाड तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावर वसलेले करंजगाव येथील श्री खंडेराव महाराज मंदीर हे मंदीर पौराणिक असून चांदोरी येथे मुक्काम करून दुसऱ्या दिवशी खंडेराव महाराज म्हाळसामाता, बानाईमाता दुपारच्या भोजनासाठी गोदावरी नदीच्या तीरावर थांबले, भोजन करून विश्रांती घेतली. ते हेच जागृत देवस्थान असून भक्ताच्या मनोकामना पुर्ण होतात.अशी आख्यायिका आहे. करंजगावी प्रत्यक्ष प्रभू श्रीरामाच्या व लक्ष्मण यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भुमी आहे.प्रभु श्रीरामानी स्वत :च्या हस्ते स्थापन केलेले…. सिद्धेश्वर महादेव मंदीर आहे. दक्षिण मुखी हनुमान मंदिर आहे. सर्व प्राचीन मंदिरे गोदावरी नदीच्या तीरावर एका रेषेत आहे. गावात मध्यवस्तीत खंडेराव महाराज मंदीर असून दरवर्षी माघ पौर्णिमेला म्हणजे च दांडी पौर्णिमेला
बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होतो. सालाबादप्रमाणे ह्या वर्षी
यात्रा उत्सव ४ फेब्रवारी.२०२५ खंडेराव महाराज सेवेकरी यांच्या हस्ते घटस्थापना होऊन सालाबाद प्रमाणे याही वर्षी विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले .
प्रभू श्रीरामचंद्रांच्या व राजमाता अहिल्याबाई होळकर ,छत्रपती शिवाजी महाराज संत श्रेष्ठ जनार्दन स्वामी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या श्री क्षेत्र करंजगाव ह्या पावन भूमीत
12 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसहा वाजता गोदावरी नदीच्या तीरावरील
श्री खंडेराव महाराज मंदिरात होम हवन मांडव डहाळे यांची वाजत गाजत मिरवणूक निघाली. संपूर्ण गावात महिला व मुलींनी सडा रांगोळी काढली.संध्याकाळी गोदाकाठी असलेल्या खंडेराव महाराज मंदीरात माजी सरपंच खंडू पाटील बोडके यांनी व मा. सरपंच मनिषा प्रवीण पाटील राजोळे यांनी संपत्नीक खंडेराव महाराजाची आरती केली. खंडेराव महाराजांचे वाहन असलेला अश्व गोदावरी नदीच्या पात्रात अंघोळीसाठी वाघे मंडळी च्या देवाची गाणी म्हणत वाजतगाजत मिरवणुकीने आणले.
अंघोळी नंतर खंडेराव महाराज मंदीरासमोर अश्वाला हळद लावली . अश्वास बाशिंग बांधून सजवल्यानंतर
अश्वाची संपूर्ण गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी बारा गाड्या ओढण्याच्या मार्गावर ठिकठिकाणी कापूर अगरबत्ती लावली… भंडा-याची उधळण करीत…
येळकोट येळकोट जय मल्हार….. सदानंदाचा येळकोट …… खंडेराव महाराज की जय… च्या जयघोषात
मिरवणूकीनंतर अश्व रथाला जोडून बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम पार पडला. बारा गाड्या अश्व ओढून जाताच… रस्त्यावर पेटवलेल्या कापूर ज्योती भंडारा कंपाळी लावण्यासाठी भाविकांची एकच झुंबड उडाली…
त्यानंतर मंदिरात भाविकांची खंडेराव महाराज मंदीरात दर्शनासाठी अलोट गर्दी उसळली. महाआरती होवून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सुनिल कराटे, जगन बाबा गांगुर्डे, रोहीदास हांडे, किरण पिठे, तुषार गोसावी, मल्हारी पावशे, सह शिवमल्हार मित्र मंडळ व खंडेराव महाराज भक्त मंडळ, पंचक्रोशीतील सर्व जय मल्हार वाघे मंडळ करंजगाव व पंचक्रोशीतील हजारो ग्रामस्थ उपस्थित होते