Breaking
ब्रेकिंग

संपूर्ण भारतात धुमाकूळ घालत आहे गायक अभिनेता जगदीश चव्हाण यांचे नवीन गाणे “तांडे तांडे म तारी रे माया, सारी गोरूर तू सेवा भाया”

0 1 0 7 4 2

 

नाशिक (विंचूर) दिनांक 15 फेब्रुवारी रोजी संत शिरोमणी सद्गुरु सेवालाल महाराज यांची जयंती संपूर्ण भारतात साजरी करण्यात आली.

संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त इंडियन आयडॉल मराठी उपविजेते जगदीश चव्हाण यांनी गायलेल्या बंजारा बोली भाषेतील गाण्याने भारतातील संपूर्ण बंजारा समाजाला वेड लावले आहे.
अत्यंत गरीब कुटुंबातील जगदीश चव्हाण हे त्यांच्या कलेच्या जोरावर फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही महाराष्ट्राचे नाव गाजवत असतात.
तसेच चव्हाण यांनी अनेक मराठी चित्रपटात पार्श्व गायक म्हणूनही काम केले आहे आणि अभिनयातही आपले नशीब आजमावत आहेत.

जगदीश चव्हाण यांनी काळजाचं पाखरू, सेवालाल तू भगवान, गरुड झेप घे रे मना, तू धाव मर्दा धाव, आम्ही छत्रपती शिवबाचे मर्द मावळे अशे अनेक प्रकारचे हिट गाणे महाराष्ट्राला दिले आहेत.
चव्हाण हे नेहमीच आपली कला चाहत्या समोर सादर करत असतात व मराठी, हिंदी, गुजराती, बंजारा या बोली भाषेत नेहमी गाणी गात असतात.
यामुळे त्यांच्या चाहत्यांनी त्यांना त्यांच्या आगामी येणाऱ्या गोरमाटी  सेवालालेर छा  या गाण्यासाठी व पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.

सारी गोरूर तू सेवाभाया

हे गाणे VR BANJARA या youtube चैनल वर पाहायला मिळेल या गाण्याचे लेखक हे कुणाल पवार असून ऋषिकेश बी यांनी ह्या गाण्याला संगीतबद्ध केले आहे व विशाल राठोड यांनी या गाण्यांमध्ये मुख्य भूमिका गाजवली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

नवप्रभा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 0 7 4 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे