Breaking
ब्रेकिंग

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात पुरेसा औषध पुरवठा करण्यात यावा सामाजिक कार्यकर्ते शहजाद पठाण यांची मागणी

0 1 0 6 4 9

 

लासलगांव ग्रामीण रुग्णालयात रुग्णांसाठी पुरेसा औषध पुरवठा करण्यात यावा तसेच या रूग्णालयाचा मोठा व्याप बघता अत्यावश्यक सेवेसाठी वैद्यकीय अधिकारी यांना कायम स्वरूपी २४ तास या रुग्णालयात हजर राहणेकामी आदेशीत करावे या सह काही महत्वाच्या मागण्यांचे लेखी निवेदन आरोग्य सेवा उपसंचालक नशिक कपिल आहेर यांना लासलगाव येथील सामाजिक कार्यकर्ते शहजाद पठाण व सहकाऱ्यांच्या वतीने देण्यात आले

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की लासलगांव व परीसरातील लोकसंख्येचा विचार करता लासलगांव ग्रामिण रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या ही मोठी असल्याने या रुग्णालयात रुग्णांना वेळेवर औषधांचा पुरवठा पुरेश्या प्रमाणात होत नसल्याने गरीब व गरजू रुग्णांची फार गैरसोय होते,परिस्थिती मुळे गरीब रुग्णांना बाहेर औषधे घेणे शक्य होत नाही.
तसेच या रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी हे काही वेळा या ठिकाणी उपलब्ध नसतात रुग्णांनी अनेक वेळा फोन करूनही डॉक्टर उपलब्ध होत नाही.प्रसंगी काही रूग्णांना जीव गमवावा लागतो,अशा अनेक घटना या आधी घडुन गेल्या आहे त्यामुळे आपत्कालीन सेवेसाठी वैद्यकीय अधिकारी यांना कायम स्वरूपी २४ तास मुख्यालयात हजर राहणेकामी आदेशीत करण्यात यावे तसेच या ग्रामिण रुग्णालयात बाह्यरुग्ण तपासणीची वेळ ही फक्त सकाळी १० ते १ असल्याने ग्रामिण भागातील रुग्णांची गर्दी अभावी तपासणी होत नाही त्यामुळे तपासणीची वेळ दुपारी ४ ते ६ सुध्दा करण्यात यावी तसेच रुग्णालयात आरोग्य कर्मचारी संख्या पाहिजे त्या प्रमाणात नाही,रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेता या ठिकाणी आरोग्य कर्मचारी संख्या वाढवण्यात यावी

वरील सर्व महत्वाच्या मागण्यांचा आरोग्य सेवा उपसंचालक यांनी काळजीपुर्वक अभ्यास करावा व समस्त लासलगांव व परीसरातील रुग्णांची हेळसांड न होऊ देता लासलगांव ग्रामिण रुग्णांलयात वरील बाबींची लवकरात लवकर पुर्तता करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.निवेदनावर शहजाद पठाण,राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक संघटक सचिव युनूस तांबोळी,,सामाजिक कार्यकर्ते मिरान पठाण,अर्शद शेख
स्मिता कुलकर्णी,नलिनी शिंदे,फरीदा काजी,संदीप उगले,राजाभाऊ कराड,महेश मोरे,मोईन पठान,इरफान शेख आवेश तांबोळी,समीर शेख,शोएब काजी आदींच्या स्वाक्षऱ्या आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

नवप्रभा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 0 6 4 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे