Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

खाकी वर्दीच्या आतिल सामान्यांना भावणारा अधिकारी , प्रसिध्दीच्या प्रवाहात न वाहणारा नितळ मनाचा झरा… सहाय्यक पोलीस निरिक्षक भास्करराव शिंदे..

0 1 0 7 0 1

नवप्रभा विशेष प्रतिनिधी

लासलगाव पोलिस ठाण्यात गतकाळात काही  अधिका-र्यांवर आरोप होवूनच बदली झाली असल्याचा इतिहास आहे , मात्र सध्या कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांच्या बाबत तसा बाका प्रसंग येणार नसल्याचे दिसून येत आहे, त्यांच्या कडे जाताना गुन्हेगार जिव मुठीत धरून जातो , तर सामान्य माणूस निर्धास्त होतो, पोलिसींग करत असतांनाही “चोर , साव ” ओळखण्याचं कसब अफलातून आहे , सोबत कार्यरत असलेल्या ” अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या ” सगळ्याच ” बित्तंबातमी ” आत्मसात ” करणारा तरबेज अधिकारी म्हणून त्यांचा कर्मचाऱ्यांमध्ये वचक आहे

सर्वसामान्यांचे गाऱ्हाणं ऐकण्यासाठी मध्यस्ताची गरज न लागता उपलब्ध होऊन समस्या सोडवणारा अधिकारी म्हणून त्यांनी लासलगावकरांच्या मनात स्थान मिळवले आहे

सहायक पोलिस निरीक्षक भास्करराव शिंदे यांच्या कारकिर्दीत कदाचित लासलगाव पोलिस ठाण्याला ” आदर्श पोलिस ठाणे ” म्हणून पुरस्कार मिळाला तर आश्चर्य वाटायला नको !.

 

 

लासलगाव पोलिस ठाण्यात सध्या कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांच्या बाबत सध्या लासलगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत सामान्य माणूस चर्चा करताना दिसत आहेत, खाकी वर्दी म्हटली की ” पोलीसां सोबत मैत्री नको अनं दुश्मनी पणं नको ” अशी सर्वसामान्यांची धारणा आहे, मात्र खाकी वर्दीच्या आतिल या अवलिया अधिका-र्यांने लासलगाव पोलिस ठाण्यात हजर झाल्यापासून अनेक महत्त्वपूर्ण प्रकरणात कठोरपणे अंमलबजावणी करण्या पासून ते ग्रामीण भागातील सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केल्याचं दिसून येते,

काल लासलगाव बाजार तळातील महादेव मंदिरापाशी अचानक वारा आणि पावसाच्या सरी येऊ लागल्याने अडोशास काही डोके उभे असल्याचे बघून तिथं आसरा घेतला त्यावेळी लासलगाव पोलीस स्टेशन व अधिकाऱ्यांबद्दल तेथे चर्चा रंगल्याचे दिसून आले त्यातच एक मनाला भावेल असा किस्सा प्रत्येकदर्शी असलेल्या ओळखीच्या व्यक्तीने सांगितला

तिन्ही सांजा ची वेळ होती ठिकाण महादेव मंदिर परिसरातील रस्ता एक वयस्कर आजी यांनी मुलंबाळं नसल्याने जगण्याची उमेद ठेवून हातापायाची हालचाल मंदावली असल्याचे लक्षात आले तरीही स्वतः जगण्यासाठी हातगाडी लोटत बाजारात भाजीपाला विक्री करून उदरनिर्वाह करीत जगण्याचा प्रयत्न करत असलेल्या ” त्या वयस्कर आजी ” लासलगाव बाजार तळ्यातून राजवाड्याच्या दिशेने हातगाडा लोटत रस्त्याच्या मधोमध चालली होती आणि पाठीमागे वाहनांची रांग लागली होती जिवात त्राण शिल्लक नसल्याने आणि मागून वाजत असलेल्या हॉर्न आजी गांगरून गेली सर्व शक्तीनिशी हातगाडा रस्त्याच्या बाजूला करण्याचा प्रयत्न करत आजी गाडा लोटत घराच्या दिशेने चालत असताना अचानक सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांच्या पोलिस गाडीचा सायरन वाजायला लागल्याने संपूर्ण बाजार तळात उपस्थित लोकांना आता या वयस्कर आजीच्या बाबत काय कारवाई होते याची उत्सुकता निर्माण झाली होती,
मात्र सायरन वाजतं असलेल्या पोलीस गाडीतून शांतपणे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांनी उतरत संबंधित वयस्कर आजीच्या हातगाडी जवळ जाऊन त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस करून त्यांच्या हातगाडीला ढकलण्यासाठी स्वतः मदत करत रस्त्याच्या मध्यभागातून कडेला घेण्यासाठी मदत केली, तसेच संबंधित वयस्कर आजीला खिशातून पाकीट काढत असलेले पैसे बळजबरीने हातात देत एका  कठोर अधिकाऱ्याच्या आतील माणुसकीचे दर्शन घडविले आहे, तसेच सदरच्या वयस्कर आजीला त्यांच्या घरापर्यंत हातगाडी पोहचवण्यासाठी व्यवस्था केली! त्यांच्या या कृतीने सर्वसामान्यांच्या मनात पोलिसांबद्दल आदर निर्माण झाला आहे… अशा कृतिशील अधिकाऱ्यास नवप्रभा न्यूज चा त्रिवार  सॅल्यूट

 

4/5 - (4 votes)

नवप्रभा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 0 7 0 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे