Breaking
ब्रेकिंग

महाराष्ट्र दिन तथा कामगार दिनी शीलामोती बहुउद्देशीय संस्था” लासलगाव तर्फे भव्य “व्यसनमुक्ती शिबिराचे “आयोजन  जास्तीत जास्त कामगारांनी लाभ घेण्याचेडॉ. चारुदत्त अहिरे यांचे  आवाहन 

0 1 0 7 4 4

महाराष्ट्र दिन तथा कामगार दिनी शीलामोती बहुउद्देशीय संस्था” लासलगाव तर्फे भव्य “व्यसनमुक्ती शिबिराचे “आयोजन  जास्तीत जास्त कामगारांनी लाभ घेण्याचेडॉ. चारुदत्त अहिरे यांचे  आवाहन

गुरुवार एक मे महाराष्ट्र दिन तथा कामगार दिन या दिवशी सकाळी १० ते १ वाजेपर्यंत “शीलामोती बहुउद्देशीय संस्था” लासलगाव तर्फे भव्य “व्यसनमुक्ती शिबिर “आयोजित करण्यात येणार आहे.
कामगार हा खऱ्या अर्थाने देशाचा केंद्रबिंदू आहे. हा कामगार वर्ग अशिक्षित असल्यामुळे व्यसनाच्या आहारी जातो आणि त्यामुळे कुटुंबाची वाताहत होते.अशा कामगार व कष्टकऱ्यांचे कुटुंब वाचविण्यासाठी
या शिबिरात ज्यांना दारूचे व्यसन जडलेले आहे त्यांच्यासाठी संस्थेतर्फे पाच दिवसांची मोफत औषधे देण्यात येणार आहे .तसेच व्यसनामुळे होणारे दुष्परिणाम याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
याप्रसंगी शिलामोती संस्थेच्या “व्यसनमुक्ती केंद्राचे “देखील उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
तरीदेखील जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे असे संस्थेचे अध्यक्ष डॉ. चारुदत्त मोतीराम आहिरे यांनी आवाहन केले आहे. सदर शिबिर शिलामोती,स्वस्थ जल मिशन, डॉ. आहिरे हॉस्पिटल, विद्यानगर ,लासलगाव येथे होणार आहे. शिबिराचा लाभ घेण्यासाठी ९४२३४७९६०४ या मोबाईल नंबर वर नोंदणी करावी . प्रथम ३० रुग्णांना प्राधान्य दिले जाईल.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

नवप्रभा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 0 7 4 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे