गोदावरीचे गटारीकरण थांबवण्यासाठी तात्काळ समिती नियुक्त करा

नासिक प्रतिनिधी:-सचिन शिंन्दे
जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनीही दिले समिती9 स्थापन करण्याचे आश्वासन
आश्वासन न पाळल्यास सोमवारी -जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल हिंदू समाज, गोदाप्रेमी आंदोलन करणार
गणेश कदम
शिवसेना सह संपर्कप्रमुख
अध्यक्ष गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समिती
सिंहस्थ कुंभमेळापूर्वी गोदावरी गटारगंगा मुक्त करण्यासाठी गोदावरीचे जतन आणि संवर्धन होणे गरजेचे आहे यासाठी गोदावरीच्या संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या संस्था तसेच साधुसंत महंत आणि वास्तुविशारद व शासकीय अधिकारी यांची सयुक्त समिती तयार करावी या समितीने घेतलेल्या निर्णयावरच गोदावरी जलप्रदुषण मुक्त करण्यासाठी होणाऱ्या कामांना मंजुरी द्यावी अशी मागणी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे शिवसेना सहसंपर्क प्रमुख व गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीचे अध्यक्ष गणेश कदम यांनी प्रत्यक्ष भेटुन केली
यावेळी गोदावरीचे उगम स्थानापासून नांदूर मधमेश्वर पर्यंत गोदावरीची झालेली जलप्रदूषणाचे आणि या जलप्रदूषणाने गोदाकाठावरील नागरिकांना झालेल्या त्वचेच्या आजारांचे वेदनादायक व्हिडिओ जिल्हाधिकारी यांना दाखवण्यात आला या बातमीचे गांभीर्य लक्षात घेऊन गोदावरी जलप्रदूषण मुक्त करण्यासाठी लवकरच समिती गठित केली जाईल असे जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी आश्वासन दिले
या बैठकीमध्ये सिंहस्थ कुंभमेळापूर्वी गोदावरीचे गटारीकरण थांबविण्यासाठी त्र्यंबक नगरपालिका, नाशिक महानगरपालिका,महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि औष्णिक विद्युत केंद्र यांनी संयुक्तपणे बैठक घेऊन सांडपाणी त्याचप्रमाणे प्रदूषित पाणी याच्यावर प्रक्रिया करून हे पाणी नांदूर मधमेश्वर च्या पुढे कसे नेता येईल या माध्यमातून गोदावरीचे जलप्रदूषणामुळे झालेले गटारीकरण थांबविण्यासाठी समिती स्थापन करण्यात यावी अशी मागणी करत जिल्हाधिकारी यांनी आश्वासन न पाळल्यास सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले जाईल असा इशारा शिवसेना सहसंपर्क गोदावरी जतन व संवर्धन संघ समितीचे अध्यक्ष गणेश कदम यांनी दिला