दिव्यांग अंजना प्रधान यांची दोन दिवसात सोलापूर जिल्यातील ऐतिहासिक नऊ किल्ले भटकंती यशस्वी
सोलापूर भुईकोट किल्ले-गढी व ऐतिहासिक मंदिरे भटकंती

पुणे TTMM ग्रुप आयोजित सोलापूर जिल्यातील ऐतिहासिक भटकंती मध्ये नाशिक वरुन दिव्यांग असणारी कु. अंजना प्रधान सहभागी झाली होती.आपल्या अपंगत्वाचा कुठलाही बाहू न करता 60% अस्थीबाधित असून एका कुबडीच्या साह्याने ऐतिहासिक भटकंती पूर्ण करत आनंद घेतला.
नाशिक वरुन रात्री 10:30 च्या बसने पुणे गाठून 4:30 वाजता पुणेवरून प्रवासाला सुरुवात करुन पहिल्या दिवशी श्री सिद्धिविनायक गणपती -सिद्धटेक येथे गणपती बाप्पा चे आशीर्वाद घेउन भटकंतीचा श्री गणेशा केला.
श्री जगदंबा देवी मंदिर – राशीन दर्शन घेउन राशीन किल्ला/ गढी पाहिली आत वस्ती आहे म्हणून बाहेरूनच किल्ला पाहिला त्यानंतर अंजनडोह किल्ला पाहिला.गावाला कोट अवशेष आहेत. किल्ला अतिशय सुंदर असून बऱ्यापैकी पडझड झालेली आढळून आली. किल्ला अतिशय छोटा आहे. पण गावातील गावकरी गडावर नियमित दर्शनासाठी येतअसतात त्यामुळे वाट चांगलीच मळलेली आहे. पावसाळ्यात मात्र जाणे कठीण असते धर्मादेवी मंदिर गडदेवी खाली गावात नवीन मंदिरे बांधले आहे.दर्शन घेउन पुढल्या प्रवासाला निघाले. करमाळा किल्ला व कमलाभवानी मंदिर,रावरंभा राजे निंबाळकर किल्ला/ गढी त्यानंतर परांडा किल्ला पाहिला अजूनही चांगल्या स्थितीत आहे.
माढा भुईकोट/ गढी -माढेश्वरी देवी मंदीर, मोहोळ किल्ला नागनाथ मंदिर दोन आहेत. एक किल्ल्याच्या परिसरात असून दुसरा रोड वर वडवळ गावात आहे.संध्याकाळी 8 वाजता सोलापूर गावात मुक्काम करुन
दुसऱ्या दिवशी 23 फेब्रुवारी रोजी सोलापूर येथील सिद्धेश्वर देवस्थान, रुपाभवानी देवी मंदिर- सोलापूर, नळदुर्ग भुईकोट किल्ला – अतिशय मोठा, सुंदर, विस्तीर्ण व सुस्थितीत असा – खंडोबा मंदिर , अनादूर,
नऊ बुरूज, जल महाल, नळदुर्ग धबधबा, रणमंडळ/रामदुर्ग ,जुना अक्कलकोट पॅलेस,स्वामी समर्थ देवस्थान दर्शन करुन नवीन पॅलेस -दुरूनच पाहिला.
या अनोख्या भटकंती मध्ये दिपक शेळके, आकाश वाघ आणि माधुरी भोसले आयोजक होते तर भूपेंद्र डेरवणकर, गणेश भंडारी, रोहित केले, रणजित मोरे, सुजित कुरांगली, संजय वर्तक, मिलिंद पानसरे, नयना ठाकूर, प्रगती म्हात्रे, अंजना प्रधान (दिव्यांग )सहभागी झाले होते.
नुकतीच अंजना ने 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त स्वच्छता मोहीम छत्रपती संभाजी नगर येथील तीन किल्ले अंतूर, जंजाळा व वेताळवाडी येथे भटकंती केली होती.