ब्रेकिंग
विंचूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी आकाश पगारे तर उपाध्यक्षपदी अक्षय साळवे, सागर कांबळे यांची निवड

0
1
0
7
4
2
विंचूर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विंचूर नगरीत विंचूर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती येत्या 14 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दि.०९/३/२०२५ रोजी सिद्धार्थ नगर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सर्व समाजबांधवांच्या एकमताने कार्यकारिणीची निवड करण्यात आली.अध्यक्षपदी आकाश पगारे तर उपाध्यक्षपदी अक्षय साळवे, सागर कांबळे यांची निवड करण्यात आली तसेच खजिनदारपदी मॉन्टी खंडीझोड, महेश रणखांबे तर कार्याध्यक्ष रुपेश निकाळे यांची निवड करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी केली जाणार असल्याची घोषणा नवीन कार्यकारिणीच्या वतीने जाहीर करण्यात आली याप्रसंगी सिद्धार्थ कॉलनीतील सर्व नागरिक उपस्थित होते.
0
1
0
7
4
2