राम मंदिरात श्रीराम नवमी उत्सव – महापूजा, कीर्तन आणि महाआरतीने गाजला भक्तिमय सोहळा

लासलगाव – श्रीराम नवमी निमित्त राम मंदिरात भव्य महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. मंदिर ट्रस्टच्यावतीने आयोजित या धार्मिक सोहळ्यात नागेश जाधव, अजिंक्य झांबरे, चिराग जोशी, सौरभ जाधव, भाग्येश मुनोत आणि संतोष लुनावत यांनी सपत्नीक महापूजेत सहभाग घेतला.
पूजेचे पौरोहित्य अशोकगुरु अग्निहोत्री, गुरुप्रसाद दिक्षित, मयूर भंडारी गुरु विजुगुरु आणि नंदू भंडारी गुरु जितू गुरव* यांनी पारंपरिक शास्त्रोक्त पद्धतीने केले.
सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प. पंडीत महाराज कोल्हे यांचे रामजन्माचे कीर्तन पार पडले. त्यांच्या प्रभावी आणि रसाळ निवेदनाने वातावरण भक्तिमय झाले.
दुपारी १२ वाजता महाआरती उत्साहात पार पडली. ही महाआरती ट्रस्टचे पदाधिकारी अशोकनाना होळकर डॉ. कैलास पाटील, डॉ. युवराज पाटील, विष्णु निकाम सुरेश वडनेरे , प्रकाश होळकर (कवी) नानासाहेब पाटील व श्रीराम जन्मोत्सव समिती यांच्या हस्ते संपन्न झाली. महाआरतीवेळी संपूर्ण परिसर “जय श्रीराम” च्या जयघोषाने दुमदुमला.
कार्यक्रमानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला. श्रीराम नवमीचा हा सोहळा भक्तांच्या सहभागाने अत्यंत उत्साही आणि आध्यात्मिक वातावरणात पार पडला.