महावितरण लासलगाव उपविभागात “लकी डिजिटल ग्राहक योजना”चे विजेते जाहीर!

महावितरण कंपनीच्या लकी डिजिटल ग्राहक योजना या नवीन योजनेच्या माध्यमातून सलग तीन महिने ऑनलाईन पद्धतीने वीज बिल भरणा करणाऱ्या ग्राहकांमधून लकी ड्रॉ पद्धतीने ग्राहकांची निवड करण्यात आली. *चांदवड विभागाचे कार्यकारी अभियंता माननीय काळुमाळी साहेब यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाच्या व द्वितीय क्रमांकाच्या ग्राहकास स्मार्टफोनतसेच पुढील क्रमांकाच्या ग्राहकांसाठी स्मार्ट वॉच हे बक्षीस वितरित करण्यात आले.
ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याने ही योजना यशस्वी ठरली.
या योजनेतून लासलगाव उपविभागांतर्गत खालील विजेते निवडण्यात आले आहेत:
१)सौ.शोभा अनिल शिंदे (खडक माळेगांव) – मोबाईल फोन
२)श्री. नरहरी कृष्णाजी गांगुर्डे (कोटमगाव) – मोबाईल फोन
३)पंकज गुलाबराव सिर्वे – मोबाईल फोन
४)जगदंबा रिपॉवरिंग मंगेश सांगळे (विंचूर) – स्मार्ट वॉच
५)कचरू कारभारी महाले (डोंगरगाव) – स्मार्ट वॉच
हे विजेते ठरले आहेत.
या विजेत्यांना मोबाईल फोन, स्मार्ट वॉच आणि 5000 रुपयांहून अधिक किंमतीची बक्षिसे प्रदान केली आहेत.
महावितरणने ग्राहकांना डिजिटल व्यवहारासाठी प्रोत्साहित करण्यासाठी ही योजना आणली होती. विजेते ठरवण्यासाठी पारदर्शक लकी ड्रॉ पद्धतीचा अवलंब करण्यात आला होता.
सदर प्रसंगी अतिरिक्त कार्यकारी अभियंता रहिंज साहेब लासलगाव उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री बागुल साहेब निफाड उपविभागाचे श्री नागरे साहेब चांदवड उपविभागाचे श्री सूर्यवंशी साहेब व पिंपळगाव उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री पाटील साहेब उपस्थित होते