निफाड तालुक्यातील विंचूरमध्ये अवैद्य मुरूम,वाळू माफीयांचा धमाकुळ महसूल प्रशासन मात्र निद्रा अवस्थेत

मुख्य संपादक -महेश साळुंके
निफाड तालुक्यातील विंचूर सर्कल मध्ये अवैध गौण खनिजांच्या तस्करीने चांगलाच जोर धरला आहे. महसूल प्रशासन याकडे पूर्ण:त दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. विंचूर एमआयडीसी , सुभाष नगर व विंचूर हद्दीतून अनेक मुरूम तस्कर रात्रीच्या वेळी ट्रॅक्टर टिप्परने मुरमाचा उपसा करत आहेत. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे या गोष्टीकडे महसूल प्रशासन का? दुर्लक्ष करत आहे असा प्रश्न सुभाष नगर व विंचूर परिसरातीलनागरिका मध्ये निर्माण झाला आहे.
याबाबत सुभाष नगर येथील रहिवाश्यांनी उपविभागीय अधिकारी हेमांगी पाटील यांना निवेदनही दिले आहे
विंचूर सर्कलमध्ये खुलेआम अवैधपणे वाळू मुरूम तस्करी, युरिया तस्करी असे अवैध व्यवसाय जोरात चालू आहेत या अवैध व्यवसायांना कोण वाचवत आहे. हा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. त्यातच महसूल चे बडे अधिकारी शनिवारी रविवारी राहत नसल्याने वाळू मुरूम माफियांचे चांगलेच फावत आहे
सदर मुरूम अवैध्य उत्खन करून शासनाचे लाखो रुपयाचे रॉयल्टी बुडून अवैध्य मुरूम व्यवसाय मुरूम माफिया दिवसाढवळ्या व रात्री करत असतात. परंतु पोलीस व महसूल विभाग याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करीत आहे महसूल विभागाची भरारी पथक या भागात फिरत नाही. अशी माहिती असून या परिसरातील तलाठी व मंडळ अधिकारी हेडक्वार्टरलाच राहत नसल्यामुळे रेतीमाफी यांची चांगली चंगल होत आहे.
रेतीवर कुठे धाड मारायची व कुठे नाही हे उपविभागीय कार्यालयातून व तहसील कार्यालयातून काही कारकूळ मंडळी ठरवीत असतात. अशी जोरदार चर्चा असून या कामात निष्पणात असलेल्या बाबू येथे महसूल कार्यालयात असल्यामुळे तो व्यवस्थित सेटिंग बसून देतो. त्यामुळे ती व्यवसायीकाला आपल्या अवैध्य रेती विक्रीचे धंदे व्यवस्थित करता येत आहे त्यासाठी महसूल विभागातील काही कर्मचारीना हिस्सा दिल्या जात असल्याची चर्चा आहे अशा अधिकाऱ्यांना उपविभागाच्या बाहेर त्यांच्या बदल्या केल्याशिवाय रेती व्यवसायावर महसूल अधिकाऱ्यांना वचक ठेवता येणार नाही हा गोरखधंदा दिवसा व रात्री होत असल्यामुळे महसूल प्रशासनास ह्या अवैध्य रेतीच्या गाड्या कशा दिसत नाही असा नागरिकांमध्ये प्रश्न निर्माण झाला आहे.