व्हाईस ऑफ मिडियाच्या येवला तालुकाध्यक्षपदी शब्बीर इनामदार यांची बिनविरोध निवड..
व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या नाशिक जिल्हा अध्यक्ष पदी किरण ठाकरे यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर सर्वप्रथम येवला तालुका कार्यकारणी जाहीर.

पाटोदा प्रतिनिधी सचिन शिंदे
व्हाईस ऑफ मिडिया या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या येवला तालुका अध्यक्षपदी पत्रकार शब्बीर इनामदार यांची बिनविरोध निवड करण्यात आली
व्हाईस ऑफ मिडीयाचे जिल्हाध्यक्ष किरण ठाकरे, जिल्हा कार्याध्यक्ष गजानन देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या बैठकीत शब्बीर इनामदार यांची बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली अध्यक्ष निवडीची सुचना पत्रकार अय्युब शाह यांनी मांडली तर गजानन देशमुख यांनी अनुमोदन दिले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अय्युब शाह यांनी केले तर आभार गजानन देशमुख यांनी मानले व्हाईस ऑफ मिडिया येवला तालुका कार्यकारिणीची निवड पुढीलप्रमाणे करण्यात आली येवला तालुकाध्यक्ष -शब्बीर इनामदार,कार्याध्यक्ष-हितेश दाभाडे, उपाध्यक्ष -दिपक उगले,
प्रविण खंडांगळे,सरचिटणीस- कौसर सय्यद
खजिनदार- अय्युब शाह,संघटक -सुनील दुनबळे
सहसंघटक -अनिस पटेल,कार्यवाह -विठ्ठल गोसावी याप्रसंगी
मोहन कुंभारकर, ,सचिन शिंदे, जाकीर शेख ,अनिल वाघ,शकील शेख आदी पत्रकार बांधव उपस्थित होते याप्रसंगी व्हॉइस ऑफ मीडिया डिजिटल विंगचे सर्व पदाधिकारी व डिजिटल विंगच्या महिला पदाधिकारी उपस्थित होते.