Breaking
ब्रेकिंग

सामाजिक क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या डॉ. चारुदत्त आहिरे यांचा ‘मानव सेवा पुरस्कारा’ने सन्मान

0 1 0 7 4 2

 

मुख्य संपादक -महेश साळुंके 

३५ व्या वर्धापन दिनानिमित्त मानव सेवा पुरस्कार वितरण समारंभ
‘जगण्यापेक्षा जगणे श्रेष्ठ’या प्रेरणेतून नाशिकच्या आरोग्य, सामाजिक, सांस्कृतिक,शैक्षणिक आणि पर्यावरण क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या “मायको एम्प्लॉईज फोरम”३५ व्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या डॉ. चारुदत्त मोतीराम आहिरे यांना ‘मानव सेवा पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.
पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह शाल व गुलाब पुष्प असे होते.
प्रमुख पाहुणे श्री.तेजिंदर नाथ इस्सार (पी.सी.बॉस लिमिटेड नाशिक,)श्री.श्रीकांत चव्हाण (जनरल मॅनेजर एच.आर बॉश लि.नाशिक,)विकास नेहे (अध्यक्ष बॉश एम्प्लॉईज युनियन, नाशिक ) सचिव,संदीप दौड, संतोष पालवे उपाध्यक्ष,राहुल खापरे जॉइंट सेक्रेटरी,योगेश खैरनार खजिनदार, स्नेहा जंगम सीएस आर प्रमुख,
संजय कुऱ्हे अध्यक्ष मायको एम्प्लॉईज फोरम, अविनाश दशपुते सचिव मायको एम्प्लॉईज फोरम यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजू नाईक व सूत्रसंचालन रविकांत शार्दूल यांनी केले.

यावेळी डॉक्टर चारुदत्त आहीरे म्हणाले इ,स 2010 साली शिक्षण ,आरोग्य आणि रोजगार ही उद्दिष्टं डोळ्यासमोर ठेऊन संस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली.अनेक अडचणी आल्या पण कधी डगमगलो नाही.आजवर पदरखर्च करून कित्येक मजूर, रुग्ण , दीन यांना आधार दिला .ही प्रेरणा मला आईवडील आणि तमाम महापुरुषांच्या विचारांतून मिळाली आहे . यापुढे मोबाईल मेडिकल व्हॅन द्वारे ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा पुरवण्याची संकल्पना आहे तसेच यावर्षी व्यसनमुक्ती अभियान राबवण्यात येणार असून त्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली,या चळवळी साठी प्रत्येकाने आपलं योगदान देण्याचं आवाहन त्यांनी केले .
प्रमुख पाहुणे विकास नेहे थोडक्यात मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी
मायको एम्प्लॉईज फोरमचे व्यवस्थापक विलास नलावडे,कर्मचारी सुधाकर देशमुख हे गत पंचवीस वर्षापासून संस्थेत कार्यरत असून यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय कुऱ्हे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आभार प्रदर्शन सचिव अविनाश दशपुते यांनी केले. या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष अशफाक कागदी, सहसचिव हेमंत सूर्यवंशी, खजिनदार सुधीर गोसावी, विश्वस्त राजू नाईक, हरीश काळे, बी. ए. सोनवणे, बॉश युनियनचे पदाधिकारी, मायको फोरमचे सहकारी व परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

नवप्रभा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 0 7 4 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे