पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे निषेधार्थ लासलगावी मुस्लिम समाजाचा मूक मोर्चा
पोलीस उपनिरीक्षक भास्कर शिंदे यांना निवेदन देण्यात आले

मुख्य संपादक -महेश साळुंके

brp_mask:0;
brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: off;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: null;temperature: 44;
जम्मू कश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे निषेधार्थ तसेच २६ भारतीय निष्पाप नागरीकांच्या झालेल्या हत्यांचा लासलगांव येथील मुस्लिम समाजाच्या वतीने मूक मोर्चा काढून जाहीर निषेध करण्यात आला, पहलगाम येथील हत्याकांडांत मृत्यू झालेल्या भारतीय नागरिकांच्या आत्म्यास शांती मिळण्यासाठी लासलगाव येथील जामा मस्जिद मध्ये दुवा मागण्यात आली. तसेच लासलगांव शहरातील जामा मस्जिदी पासून मुक काढण्यात आला. मोर्चात लासलगांव शहरातील सकल मुस्लिम बांधव सामील झाले होते . शांततेच्या मार्गाने समस्त मुस्लिम बांधव सदर अप्रिय घटनेचा मुक मोर्चाद्वारे निषेध करत होते.
लासलगाव पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक भास्कर शिंदे यांना मुस्लिम समाजातर्फे निवेदन देण्यात आले सदर निवेदनात पाकिस्तान व अतिरेक्यांविरोधात भारताने कठोरभूमिका घ्यावी सकल मुस्लिम समाज पाकिस्तानी अतिरेक्यांविरोधात सरकार सोबत असल्याचे नमूद करण्यात आले आहे . सदर मुक मोर्चा हा जामा मस्जिद, बाजारतळ ते या मार्गाने लासलगाव पोलीस ठाण्या पर्यंत. काढण्यात आला मुस्लिम समुदायाची लक्षणीय उपस्थिती होती