Breaking
ब्रेकिंग

सर्व मानांकनांमध्ये चांदवड विभागात महावितरण निफाड उपविभाग अव्वल स्थानावर मुख्य अभियंता श्री सुंदर लटपटे साहेब यांच्या हस्ते उपकार्यकारी अभियंता श्री निलेश नागरे यांचा सत्कार

0 1 0 7 2 7

 

 

 

वीज चोरीचे प्रमाण कमी करा, वीज गळती थांबवा, त्यासाठी विविध उपाययोजना करा असे प्रतिपादन मा मुख्य अभियंता श्री सुंदर लटपटे यांनी चांदवड विभागीय कार्यालय येथे आयोजित सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात केले. चांदवड विभाग अंतर्गत येणाऱ्या निफाड उपविभागाने विक्रमी वसुली करत चांदवड विभागात महावितरण कंपनीच्या सर्व मानांकनांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला, त्याबद्दल चांदवड येथील सत्कार तथा कौतुक सोहळ्यात उपकार्यकारी अभियंता निफाड श्री निलेश नागरे व त्यांचे सर्व शाखा अभियंता यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री सुंदर लटपटे, नाशिक मंडळाचे अधीक्षक अभियंता श्री ज्ञानदेव पडळकर, विद्युत निरीक्षक विभागाचे विद्युत निरीक्षक श्री भागवत उगले व चांदवड विभागाचे कार्यकारी अभियंता श्री केशव काळूमाळी यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक अभियंता पुजा रघुवंशी, कनिष्ठ अभियंता श्री पाचंगे, श्री बोरसे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी अभियंता श्री केशव काळू माळी यांनी केले.
वीज चोरी मुक्त गाव ही संकल्पना माननीय अधीक्षक अभियंता यांनी त्यांच्या भाषणात मांडली. वीज गळतीचे प्रमाण कमी करा याबाबत मुख्य अभियंता श्री सुंदर लटपटे यांनी मार्गदर्शन केले. विद्युत सुरक्षा हा सुद्धा सर्वात महत्त्वाचा विषय आहे याबाबत श्री भागवत उगले यांनी मार्गदर्शन केले.
संपूर्ण चांदवड विभागातील लासलगाव निफाड चांदवड व पिंपळगाव उपविभागाचे अंतर्गत येणारे सर्व शाखा अभियंता जनमित्र बाह्य स्त्रोत कर्मचारी सर्व यंत्रचालक बिलिंग मधील कर्मचारी अशी एकूण 400 अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला. गुणगौरव सेल्फी पॉईंट हा या कार्यक्रमाचे आकर्षण बिंदू ठरला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

नवप्रभा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 0 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे