लासलगाव येथील भावसार क्षत्रिय समाज संस्थेच्या वतीने हिंगलाज माता प्रकट दिन उत्साहात साजरा

२७ मार्च २०२५ वार गुरुवार रोजी हिंगलाज माता प्रकट दिन उत्साहात साजरा केला गेला सलाबाद प्रमाणे याही वर्षी भावसार क्षत्रिय समाजाच्या वतीने पारंपरिक पद्धतीने हा उत्सव साजरा करतांना हिंगलाज माता व रेणुका मातेच्या प्रतिमेला पुष्पहार घालून महिलांनी मनोभावे पूजा करून पारंपरिक नृत्य भावसार समाजाच्या महिलानि केले.
त्यानंतर जमलेला भावसार समाज व पंचक्रोशीतील भाविक यांच्या हजेरीत देवीला चने व डाळ बाटी चा नैवेद्य देऊन क्षत्रिय भावसार समाजाचे अध्यक्ष अमित भावसार यांच्याहस्ते सपत्नीक महाआरती करण्यात आली .
नवनिर्वाचीत समाजाचे ट्रस्टी ने कार्यक्रमाचे नियोजन अतिशय सुंदर असे केले होते मागील वर्षीपर्यंत हा उत्सव फक्त लासलगाव भावसार समाजापूरता मर्यादित होता यावर्षी पहिल्यांदाच पंचक्रोशीतील मान्यवरांना आमंत्रित केले गेले होते.
महाआरती झाल्यानंतर लगेचच पंचक्रोशीतील ४०० ते ५०० उपस्थितांनि महाप्रसादाचा आस्वाद घेतला .
समाजातील तरुण पिढीने यावेळी मोलाचे सहकार्य केले.
पंचक्रोशीतील सर्वांनि महाप्रसाद घेतल्यानंतर क्षत्रिय भावसार समाजाणे एकत्रित महाप्रसादाचा आस्वाद घेतला एकंदरीत खेळीमेळीच्या वातावरणात व उत्साहात हिंगलाज मातेचा प्रकट दिन साजरा केला गेला.
लासलगाव भावसार समाजातील जेष्ठांनी नवनिर्वाची कमिटीने केलेल्या या कार्याचे भरभरून कौतुक केले.