Breaking
ब्रेकिंग

तरुण पिढी आपल्या देशाचे भविष्य असून भावी पिढी व्यसनमुक्तीसाठीची चळवळ ही व्यापक प्रमाणात व्हायला हवी-सपोनि भास्कर शिंदे यांचे प्रतिपादन

एक मे महाराष्ट्र दिन तथा कामगार दिनानिमित्त शिलामती बहुउद्देशीय संस्थेतर्फेव्यसनमुक्ती शिबिराचे आयोजन संपन्न

0 1 0 7 4 4

मुख्य संपादक -महेश साळुंके

एक मे महाराष्ट्र दिन तथा कामगार दिनानिमित्त शिलामती बहुउद्देशीय संस्थेतर्फे संस्थेचे अध्यक्ष डॉ. चारुदत्त मोतीराम अहिरे यांनी व्यसनमुक्ती शिबिराचे आयोजन केले होते.
या शिबिराचे उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्ष सौ योगिताताई पाटील, सरपंच लासलगाव ग्रामपंचायत, यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना ,संस्थेने सुरू केलेल्या व्यसनमुक्ती अभियानासाठी ग्रामपंचायत तर्फे सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन या प्रसंगी ताईंनी दिले.
प्रमुख पाहुणे श्री भास्कर जी शिंदे पोलीस उपनिरीक्षक, लासलगाव पोलीस स्टेशन यांचे हस्ते संस्थेच्या व्यसनमुक्ती केंद्राचे उद्घाटन करण्यात आले .तसेच उपस्थितांना मार्गदर्शन करताना साहेबांनी व्यसनमुक्तीची चळवळ ही व्यापक प्रमाणात व्हायला हवी तसेच तरुण पिढी आपल्या देशाचे भविष्य असून भावी पिढी व्यसनमुक्त करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले

filter: 109; fileterIntensity: 1.0; filterMask: 0; captureOrientation: 0;
brp_mask:0;
brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: off;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: null;temperature: 43;

या कार्यक्रमाला लासलगाव डॉक्टर्स असोसिएशन चे अध्यक्ष डॉ. स्वप्निल जैन तसेच लासलगाव निमाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल ठाकरे यांनी संस्थे करीत असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाची सुरुवात संविधान उद्देशिकेचे वाचन व राज्यगिताने करण्यात आली. या कार्यक्रमात पहेलगाम येथे मृत्युमुखी झालेल्या भारतीय नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
डॉ. चारुदत्त आहिरे यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिन याचे महत्त्व विशद करत संस्थेच्या आजपर्यंतच्या कार्याचा लेखाजोखा सर्वांसमोर मांडला. व या कार्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले.
वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला समाजरत्न -अरविंद देसाई,वृद्धाश्रम संचालक – नवनाथ जराड, नवप्रभा यू ट्यूब चॅनल- महेश साळुंखे, आदर्श शिक्षिका -सौ आशा झाल्टे,शैक्षणिक कामगिरी- राज श्रीवास्तव,आदर्श ग्रामपंचायत – सरपंच व बाबा गीते यांना आपल संविधान पुस्तिका देऊन सन्मान करण्यात आला.
व्यसनमुक्ती शिबिरात 30 रुग्णांना संस्थेतर्फे मोफत औषधे वाटप करण्यात आली, व व्यसन सोडण्यासाठी नियमित व्यसनमुक्ती केंद्राला भेट देऊन आपण मार्गदर्शन बघेण्याचे आवाहन केले.
संस्थेतर्फे श्रीमती शीला आहीरे,सौ.दीप्ती आहिरे,सौ.जयश्री आहिरे, विनोद आहिरे,मृण्मयी आहिरे,राजेंद्र भागवत यांनी सहकार्य केले, अभिषेक गांगुर्डे यांनी आभारप्रदर्शन केले .
या कार्यक्रमासाठी योगेशजी पाटील ,श्रीमती हिराबाई होळकर , सौ.सविता जाधव , सूरज झाल्टे सर , एकनाथ ठेंगे,रामभाऊ केदारे, श्री. ,मनोज देसाई आदी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

नवप्रभा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 0 7 4 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे