Breaking
ब्रेकिंग

हनुमान जयंती निमित्त येवला तालुक्यातील धानोरे येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

0 1 0 7 4 2

 

येवला प्रतिनिधी:-मनिषा चव्हाण

 

येवला शहरासह तालुक्यात विविध मंदिरांमध्ये हनुमान जयंती साजरी करण्यात आली आहे. येवला मनमाड महामार्ग वरती असलेले धानोरी येथील 51 फुटी हनुमानच्या दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केल्याचे चित्र दिसून आले.
सकाळच्या सुमारास भव्य हनुमानाच्या मूर्तीची विधिवत पूजा करून. यावेळी महाआरतीनंतर हनुमान चालीसाची पठण करण्यात आले. बजरंग बली की जय असा जयघोष करत हनुमान जन्मोत्सव येथील सर्व भाविकांनी साजरा केला. याप्रसंगी ह.भ.प गोकुळ महाराज चौधरी यांचा कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला.महाराजांनी प्रभू श्री रामचंद्र सेवक हनुमंतरायांच्या पराक्रमाची आठवण करुन देत जमलेल्या भावी भक्तांची मन जिंकली .
कार्यक्रमानंतर उपस्थित सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

धानोरे येथील हा उत्सव केवळ एक धार्मिक कार्यक्रम नसून तो एक सामाजिक आणि सांस्कृतिक एकत्रिततेचे प्रतीक आहे. आजूबाजूच्या भागातील सर्वच भाविक भक्तांनी यात सहभाग घ्यावा व कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे प्रतिपादन 20 ते 25 वर्ष याच मंदिरात सेवा करत असणारे महंत श्री रामेश्वर गिरी महाराज यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

नवप्रभा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 0 7 4 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे