तकदीर हैं कि चलने ना पाये पर जिद्द हैं कि रुकते ना जाये!! अपंगत्वावर मात करत दिव्यांग अंजना प्रधान व काजल कांबळे यांनी चार दिवसात पंधरा किल्यांची भटकंती पूर्ण

मुख्य संपादक- महेश साळुंके
सह्याद्री मुंबई TTMM ग्रुप लीडर तेजस लोकरे व स्वप्नाली सावन्त आयोजित कोकण किल्ले भटकंती मोहीम आयोजित करण्यात आली होती त्यात जवळजवळ तेवीस सदस्य, मुंबई,पनवेल डोंबिवली, नाशिक, पुणे,कराड, सांगली फलटण, आदी जिल्यातील सदस्य सहभागी झाले होते. चार दिवसाच्या या भटकंती मध्ये,गोपाळगड किल्ला, विजयग किल्ला,जयगड किल्ला,रत्नदुर्ग किल्ला,पूर्णगड किल्ला,आंबोळगड, घेरा यशवंतगड,विजयदुर्ग किल्ला,
देवगड किल्ला,भरतगड किल्ला, सर्जेकोट,राजकोट,सिंधुदुर्ग किल्ला,पद्मगड किल्ला,मालवण बीच,किल्ले निवती,यशवंतगड किल्ला,रेडी बीच,वेतोबा मंदिर, कुणकेश्वर मंदिर,रेडी गणपती मंदीर आदी किल्ले, मंदिरे व स्थळांची भटकंती संपन्न झाली.
ग्रुप लिडर तेजस लोकरे व स्वप्नाली सावंत,वसंत घोडके,
नम्रता बोरबंडे,राम सातपुते,
सुनिता सातपुते,मुग्धा बोरबंडे,
गौरव गवाणकर,अंबिका ठाकूर
श्रीराम देशपांडे,रामचंद्र कर्णे,
दीपक स्वामी,प्रथमेश गोवळकर
तृप्ती मोरे,विग्नेशा पटेल,सुहास वराडकर,मानसी वैद्य,अभियश खांडेकर,दिपाली कैलाजे, सीमा कारंजे, दक्षायिनी कार्केरा, ऋषिकेश गोरे,काजल कांबळे, अंजली प्रधान आदी सहभागी झाले होते. दिव्यांग अंजनाने एका बैसाकीच्या साहयाने कोकणातील प्रचंड गर्मीत, घामाच्या धारात चार दिवसात पंधरा किल्ले व तेथील काही प्रसिद्ध मंदिरे भटकंती पूर्ण केली. यासाठी ग्रुप लिडर तेजस लोकरे यांनी त्यांना वेळोवेळी प्रोसाहीत, केले इतर सर्व मेंबर चे सहकार्य मिळाले. खरं तर माझ्यासाठी अशक्य असणारी, दमछाक करणारी भटकंती असतानाही ग्रुपच्या सहकार्यामुळे मला पूर्ण करता आली असं अंजना ने सांगितलं.अंजनाने नेमकीच फेब्रुवारी मध्ये देखील दोन दिवसात सोलापूर जिल्ह्याततील तेरा भुईकोट किल्ले व ऐतिहासिक स्थळ – मंदिरांची भटकंती केली होती.भटकंती ची आवड असल्यामुळे आपल्या अपंगत्वाचा कुठलाही बाऊ न करता अंजनाची वेगवेगळ्या किल्यांची भटकंती चालूच असते.यासाठी सक्षम,गरुडझेप, शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था, शिवूर्जा प्रतिष्ठान, रॉयल रायडर्स, नाभिक आरक्षण समिती, अर्चना राहुल पाटील यांचे मार्गदर्शक, प्रोसाहन अंजनाला नेहमीच लाभत असते.