Breaking
ब्रेकिंग

लासलगावी आंबेडकरी जनतेचा जल्लोष…. आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

0 1 0 7 4 3

लासलगावी भिमजयंती उत्साहात साजरी

लासलगाव:येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्ताने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले.
आज सकाळपासूनच डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ एकच गर्दी जमली होती.निळे झेंडे , विद्युत रोषणाई,सुरेल ढोलपथकाने लासलगाव नगरी दुमदुमुन गेली.लहान सहान चिमुकल्यानी लेझीमपथकाच्या माध्यमातून अनोखे अभिवादन सादरीकरण केले .
लासलगावच्या प्रथम नागरिक सौ.योगिता पाटील व जयंती अध्यक्ष आदेश शेजवळ यानी बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केले.त्यानंतर यशोधरा व रमाई महीला मंडळ यानी सामुदायिक त्रिसरण पंचशील पठण केले.
त्यानंतर मुंबई कु उ बा स संचालक जयदत्त होळकर, लासलगाव बाजार समितीचे सभापती डी के नाना जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे, सचिन होळकर यानी अभिवादन करुन जयंतीच्या शुभेच्छा दिल्यात. ..
बाबासाहेबांचे विचार हे परिसा सारखे आहेत त्यामुळे माणसाच्या आयुष्याचे सोने झाल्याशिवाय राहणार नाही.असे कृ उ बा स चे नवनिर्वाचित सभापती डि के जगताप यानी केले…

या सोबतच मा राजेंद्र चाफेकर , शिवा सुरासे, डॉ विकास चांदर, रामनाथ शेजवळ , विकास खंडीझोड, मनोज शेजवळ, केशव जाधव, सुवर्णाताई जगताप , आरती भालेराव यानी मनोगत व्यक्त केलेआणि जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या ..सदर कार्यक्रमास रवि होळकर , कैलास केदारे , योगेश पाटील, संतोष पानगव्हाणे,
,बद्री शेजवळ ,गोरख अढांगळे,साहेबराव केदारे,भास्कर शेजवळ , रमेश कर्डक , सागर आहिरे,राजेन्द्र बक्छाव, मंगेश आहीरे ,मनोहर आहिरे, प्रा जालिंदर बगाडे,सोनु शेजवळ,अनिल शेजवळ , नाना सुर्यवंशी ,महेश मोरे राहुल पवार,आशिष शेजवळ ,उमेश शेजवळ,गोटु शेजवळ ,आदिल शेख महिलावर्गात
प्रद्न्या शेजवळ ,तुळसाताई शेजवळ ,निर्मला शेजवळ ,भारती शेजवळ ,प्रिती शेजवळ भारती शेजवळ ,मनिषा शेजवळ, शैला आहिरे ,सुशिला शेजवळ रमन शेजवळ , माया केदारे, ज्योती शंभरकर, रेखा गायकवाड, आरती भालेराव आदि उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

नवप्रभा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 0 7 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे