भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी आदेश शेजवळ यांची निवड.

मुख्य संपादक -महेश साळुंके
लासलगाव -नालंदा बौद्ध विहार लासलगाव या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीची बैठक पार पडली त्यामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरी व्हावी यासाठी ठराव मांडण्यात आला. आणि त्यात सर्वानुमते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव 2025 समिती लासलगांवच्या अध्यक्षपदी आदेश सतिष शेजवळ यांची एकमताने निवड करण्यात आली .
त्यांनी समाजाला विश्वास दिला की डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचा या चार दिवसीय कार्यक्रमामध्ये जल्लोषात व प्रबोधनात्मक जयंती यावर्षी साजरी करण्यात येईल त्या मध्ये महात्मा फुले जयंती ही साजरी केली जाईल
तसेच उपाध्यक्ष म्हणून हर्षद पगारे व आदिल शेख यांची निवड करण्यात आली
तसेच सचिव- सोनू भाऊ मोरे
सह सचिव – आवेश नेटारे
कार्याध्यक्ष – नानासाहेब सूर्यवंशी
सह कार्याध्यश – सलमान पठाण
खजिनदार- मनोज शेजवळ
सह खजिनदार – अशोक गायकवाड
सदस्य-योगेश शेजवळ, सागर आहिरे, विकास खंडिझोड, राहुल पवार,सल्लागार- रामनाथ शेजवळ, चंद्रकांत शेजवळ अनिल शेजवळ ,मनोहर आहिरे सुधाकर शेजवळ, भोला पवार, डॉ अमोल शेजवळ, संतोष शेजवळ, नितिन शेजवळ यांची ही निवड करण्यात आली
यावेळी बैठकीला माजी जयंती अध्यक्ष वैभव शेजवळ, पिंटू शेजवळ,सोनू शेजवळ, बाळा शेजवळ, गौतम शेजवळ, राजू शेजवळ, विलास खैरनार, मंगेश अहिरे, सोनू केदारे, अजय जाधव, अनिकेत शेजवळ, करण विस्ते, आकाश गरुड, आरिफ बेग, बंटी शेजवळ,विपुल शेजवळ, निखिल पवार,अंशू नेटावटे, स्वप्नील शेजवळ, किरण वडघुळे, दिपक सरोदे, शाहरूख पठाण ,शाहरूख शेख, तसेच समाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.