Breaking
ब्रेकिंग

नाशिकमध्ये नागरीकांच्या सतर्कतेमुळे जनावराचे मांस वाहतूक करणारा कंटेनर सह ८० लाखांचा मुद्देमाल जप्त चालक अटकेत 

0 1 0 7 4 2

मुख्य संपादक -महेश साळुंके 

 

नाशिक मधील मुंबई-आग्रा महामार्गावर मोठ्या प्रमाणात गोमांस वाहतूक होत असल्याचे समजताच पोलिसांनी कारवाई करत वातानुकूलित कंटेनरमधून ८० लाख ११ हजार ५०० रुपयांचे जनावराचे मांस जप्त केले. तसेच, कंटेनर चालकाला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कारवाईत पोलिसांनी ८०,११,५०० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यात ६५,११,५०० किमतीचे १४४७ बाॅक्स व १५,००,००० किमतीचा अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर MH 46 AR 0797 यांचा समावेश आहे.


नाशिक येथील नागरीक बजरंग दलाचे सतर्क कार्यकर्ते विजय चव्हाण हे आपल्या दुचाकीवरून जात असताना गरवारे रोडजवळ महामार्गावर एक मोठा कंटेनर उभा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. कंटेनरखाली पाणी साचले होते. आणि त्यातून उग्र वास येत असल्याने त्यांनी संशय व्यक्त करून चालकाकडे चौकशी केली. मात्र, चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले.एमआयडीसी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंच व शासकीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कंटेनरची तपासणी करण्यात आली. यावेळी कंटेनर वातानुकूलित असल्याचे आढळले. त्यात एकावर एक ठेवलेली एकूण १,४४७ कार्टून्स सापडली. काही बॉक्स उघडून पाहिल्यावर त्यामध्ये जनावराचे मांस असल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांनी नमुने गोळा करून न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत. चालक दुर्गेश पन्नालाल जैस्वाल (वय २५, रा. उरण, नवी मुंबई) याने सदर माल मालेगाव येथून भरल्याचे आणि तळोजा एमआयडीसी, नवी मुंबई येथे पोहोचवायचा असल्याचे सांगितले. मात्र, त्याच्याकडे कोणतेही अधिकृत दस्तऐवज, परवाने किंवा बिल नव्हते. त्यामुळे पोलिसांनी संपूर्ण माल जप्त केला आणि चालकाला अटक केली. या प्रकरणी कलम 325, 3(5) सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 5(अ), 5(क), 9(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेवाळे करत आहेत. या घटनेमुळे नाशिकमध्ये जनावराचे मांस वाहतुकीचा मोठा रॅकेट सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी सखोल तपास करावा अशी मागणी गोरक्षकांनी केली आहे.यावेळी राष्ट्रीय बजरंग दलाचे कार्यकर्ते, विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्या सह हिंदुत्ववादी संघटनाचे शेकडो नागरीकांनी जय श्रीराम च्या घोषणा देत कार्यवाही करण्यास भाग पाडले.

4/5 - (1 vote)

नवप्रभा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 0 7 4 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे