Breaking
ब्रेकिंगसंपादकीय

पोलीस अधिकाऱ्यास ओरडून बोलल्याने आयपीसीच्या कलम ३५३ अन्वये गुन्हा दाखल होऊ शकत नाही मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल..!

अधिवक्ता नारायण रोकडे यांनी मांडली अमर शिवाजीराव चव्हाण यांची बाजू

0 1 0 7 4 4

 

मुख्य संपादन: महेश साळुंके

♦️ही एक एफ आय आर रद्द करण्यासाठीचा याचिका आहे अमर चव्हाण यांनी पोलीस अधिकाऱ्या समोर ओरडल्याने आयपीसीच्या कलम १८६ व ३५३ अन्वये गुन्हा दाखल झाला होता
या गुन्ह्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने सदर खालील न्यायालयाच्या कामकाजात स्थगिती  दिली  आहे .

♦️ न्यायमूर्ती. सारंग व कोतवाल  आणि  स.म मोडक आणि  यांच्या खंडपीठाने हा निर्णय घेतला, ज्यांनी स्थगिती देण्याच्या  प्रक्रियेतील प्रक्रियात्मक बाबी लक्षात घेतल्या.

कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मुरगूड पोलीस ठाणे हद्दीत अर्जुननगर अर्जुनी ता.कागल जिल्हा कोल्हापूर  येथे धनश्री कला, क्रिडा सांस्कृतीक व मनोरंजन या मंडळाचे येथे येवुन रितसर पहाणी करुन तेथे सुरु असलेला पैसे लावुन पत्याचे पानाचा जुगार हा बेकायदेशिर सुरु असल्याची खात्री झाल्याने आम्ही कायदेशिर कारवाई करत असताना सदर व्यवसायाचा मुळ मालक अमर शिवाजीराव चव्हाण यादवनगर ता. कागल जि.कोल्हापूर याने मी पोलीस महासंचालक यांचेकडुन परवाना घेतलेला आहे. मी वेळावेळी पोलीस अधीक्षक यांना

भेटलेलो आहे. मी तुमची तक्रार करणार आहे. मी तुम्हाला सोडणार नाही, मी तुमचे विरुध्द तक्रार
करतो. माझेकडे पोलीसांनी येथे प्रवेश करायचा नाही असा न्यायालयाचा आदेश आहेत, तमच्यावर कन्टेम्पट ऑफ कोर्ट दाखल करतो असा धाक दाखवून हुज्जत घालुन त्याने आरडा ओरडा सुरु करुन सरकारी कामामध्ये त्याने व्यत्यय निर्माण केला आहे आयपीसीच्या कलम १८६ व ३५३ अन्वये एफ आय आर नोंदवली

न्यायालयाच्या कामकाजादरम्यान, अमर चव्हाण यांची बाजू मांडणारे अधिवक्ता नारायणराव रोकडे  यांनी युक्तिवाद केला की, FIR आणि संपूर्ण आरोपपत्राचा विचार केला तरी, IPC च्या कलम ३५३ अंतर्गत कोणताही गुन्हा सिद्ध होत नाही कारण सध्याच्या याचिकाकर्त्याने कोणतीही ताकद किंवा गुन्हेगारी ताकद वापरल्याचा उल्लेख नाही.

अतिरिक्त सरकारी वकील वाय एम नाखवा यांनी सांगितले की, IPC च्या कलम ३५३ अंतर्गत गुन्हा सिद्ध झाला आहे. परंतु, ते याचिकाकर्त्याने केलेल्या कृत्याने ‘ताकद’ आणि ‘गुन्हेगारी ताकद’ यांची व्याख्या कशी लागू होते आणि त्याच्यावर आरोप केलेला गुन्हा कसा सिद्ध झाला हे दाखवून देऊ शकले नाही.

 

मुंबई उच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदविले की,
FIR आणि आरोपपत्रातील आरोपांचा विचार करता, आम्हाला याचिकाकर्त्याच्या वकीलाच्या युक्तीमध्ये प्राथमिक स्वरूपात तथ्य आढळते की, केवळ ओरडल्याने IPC च्या कलम ३५३अंतर्गत गुन्हा सिद्ध होणार नाही. त्यामुळे याचिकाकर्त्यावरील आयपीसी च्या कलम ३५३ अंतर्गत झालेला एफ आय आर बाबत खालील  न्यायालयात सुरू असलेल्या  सुनावणीस स्थगिती देत आहेत

1.7/5 - (3 votes)

नवप्रभा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 0 7 4 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे